• Download App
    रक्षा खडसेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप ; म्हणाल्या- " मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला पाहिजे "Raksha Khadse accuses CM; He said, "The word given by Chief Minister Uddhav Thackeray should be kept."

    रक्षा खडसेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप ; म्हणाल्या- ” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला पाहिजे “

    मुख्यमंत्री ज्या प्रमाणे शेतकऱ्यांशी बोलले त्या प्रमाणे मात्र ते वागत नाहीत.राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना मात्र ते आता सरसकट नुकसान भरपाई देत नाहीत.Raksha Khadse accuses CM; He said, “The word given by Chief Minister Uddhav Thackeray should be kept.”


    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा बैठक आटोपल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या की , जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा ते औरंगाबाद येथे म्हणाले होते की, शेतिच्या नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेकटरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई दयावी.

    दरम्यान उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहेत.मग आता त्यांनी त्यांचा शब्द पाळावा मात्र ते शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही असा आरोप भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे.



    या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री ज्या प्रमाणे शेतकऱ्यांशी बोलले त्या प्रमाणे मात्र ते वागत नाहीत.राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना मात्र ते आता सरसकट नुकसान भरपाई देत नाहीत.पंचनामे केल्यानंतर नुकसान भरपाई देण्यात येईल असे आता सांगत आहेत. आता त्यानी आपण दिलेला शब्द पाळून नुकसान भरपाई दयावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

    पुढे रक्षा खडसे यांनी आरोप केलाय की मुख्यमंत्री शेतकरी विरोधी आहेत .असा आरोप देखील रक्षा खडसे यांनी केला आहे.पुढे त्या म्हणाल्या की , शेतकऱ्याची वीज थकबाकी झाल्यास कट करू नये .याबाबतीत मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार ,कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिले.पत्र फक्त एकच लिहिले नाही तर तब्बल २५ पत्र दिली आहेत. मात्र त्याची दखल घेत नाहीत.

    Raksha Khadse accuses CM; He said, “The word given by Chief Minister Uddhav Thackeray should be kept.”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून