विशेष प्रतिनिधी
पुणे : पूर्वांचलं राज्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या बहिणीनं साठी पुणे शहरातील विविध गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला खास राखी पौर्णिमेचा सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलं होतं. या मध्ये राखीच्या रेशमी धाग्याने बंध जोडत ‘आम्ही तुमचे भाऊ आहोत, तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका’ अशी ग्वाही दिली. Rakhi Purnima celebration.
साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूश शहा यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमा मुळे बहिण-भावाचं नात घट्ट करणारा हा अनोखा सोहळा रंगला.
मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि मणिपूरमधील अनेक मुलींचं पुण्यात शिक्षणा निमित्त वास्तव्य आहे. या युवतींनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचे औक्षण करून राखी बांधली. विशेष म्हणजे या राख्याही या युवतींनीच स्वत: बनविलेल्या होत्या आणि मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या हातावर बांधतांना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उटल्याचे जाणवत होते.
नरेंद्र व्यास, सादिक सिरट्टी, प्रल्हाद थोरात, गोविंद वरंदानी, कुणाल पवार, अभिषेक मारणे, स्वप्नील थोरवे, राकेश चव्हाण, अमर लांडे, सचिन पवार, जहिर दरबार, अमित जाधव, हरिश खंडेलवाल, निसार शेख यांच्यासह 21 गणेश मंडळांचे कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. शुभांगी कंक, संपदा खोले, प्रमोद प्रंचड यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जहिर दरबार यांनी मुलींच्या आवडीची चित्रपट गीते सादर केली. पियूश शहा यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
Rakhi Purnima celebration.
महत्वाच्या बातम्या
- उत्तराखंडमध्ये यावर्षीच लागू होणार समान नागरी संहिता, मुख्यमंत्री धामींची मोठी घोषणा!
- इस्रोच्या स्थापनेत नेहरूंचे नव्हे, TIFR चे योगदान; वाचा आणि ऐका सत्य इतिहास!!
- चांद्रयान-३च्या रोव्हर ‘प्रग्यान’ने पृथ्वीवासीयांसाठी पाठवला खास संदेश! जाणून घ्या, काय म्हटले?
- सिलेंडरचे भाव मोदींनी उतरवले; काँग्रेसच्या पोटातले “गॅस” सुटले!!