• Download App
    राकेश झुनझुनवाला यांना पावली टाटा मोटर्स, तीन दिवसांत कमावले चक्क 310 कोटी रुपये|Rakesh Jhunjhunwala earned Rs 310 crore in three days from avli Tata Motors

    राकेश झुनझुनवाला यांना पावली टाटा मोटर्स, तीन दिवसांत कमावले चक्क 310 कोटी रुपये

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शेअर बाजारातील दिगग्ज राकेश झुनझुनवाला यांना टाटा मोटर्स चांगलीच पावली आहे. केवळ तीन सत्रात त्यांनी चक्क 310 कोटी रुपये कमावले आहेत.राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती गेल्या काही काळात चांगलीच वाढली आहे.Rakesh Jhunjhunwala earned Rs 310 crore in three days from avli Tata Motors

    त्याचे कारण म्हणजे नाझारा टेक, टायटन कंपनी, टाटा मोटर्स सारख्या शेअरमध्ये झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केली आहे आहे. टाटा मोटर्सच्या शेअर किमतीचा इतिहास पाहता, राकेश झुनझुनवाला यांनी या शेअरमधून फक्त तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये ३१० कोटी रुपये कमावले आहेत.



    सहा ऑक्टोबर २०२१ रोजी टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत ३३५.६० रुपये होती. फक्त तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये वाढून ४१७.८० रुपये झाली. म्हणजेच, टाटा मोटर्सचे शेअर्स अवघ्या तीन दिवसात २५% पर्यंत चढले. राकेश झुनझुनवाला यांचा टाटा मोटर्समध्ये १.१४% हिस्सा आहे. त्यानुसार, त्यांनी फक्त तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये ३१० कोटी रुपयांचा नफा कमावला.

    टाटा मोटर्स DVR चे शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक वाढीसह २०१.१० रुपयांवर बंद झाले.जून २०२१ च्या तिमाहीत टाटा मोटर्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे एकूण ३,७७,५०,००० शेअर्स होते. हे कंपनीच्या एकूण १.१४% हिस्सेदारीच्या बरोबरीचे आहे. यापूर्वी मार्च २०२१ च्या तिमाहीत, झुनझुनवालाकडे टाटा मोटर्सचे ४,२७,५०,००० शेअर्स होते. जून तिमाहीत राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्समधील हिस्सा कमी केला होता.

    Rakesh Jhunjhunwala earned Rs 310 crore in three days from avli Tata Motors

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस