• Download App
    नांदेडच्या मराठा आंदोलकांवर गुन्हे; गुन्हे माझ्यावर दाखल करा; खासदार संभाजी राजे यांचे ठाकरे – पवार सरकारला आव्हान Rajya sabha MP Sambhaji Raje dares Thackeray - Pawar govt over Maratha reservation issue

    नांदेडच्या मराठा आंदोलकांवर गुन्हे; गुन्हे माझ्यावर दाखल करा; खासदार संभाजी राजे यांचे ठाकरे – पवार सरकारला आव्हान

    प्रतिनिधी

    कोल्हापूर – मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये खासदार संभाजी राजे यांनी घेतलेल्या मेळाव्यात हजर राहिलेल्या मराठा आंदोलकांवर ठाकरे – पवार सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. त्यावरून खासदार संभाजी राजे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गुन्हे दाखल करायचे असतील, तर माझ्यावर करा, असे आव्हानच त्यांनी सरकारला दिले आहे. Rajya sabha MP Sambhaji Raje dares Thackeray – Pawar govt over Maratha reservation issue

    मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या सर्व सवलती मिळाव्यात, सारथी संस्थेला भरीव निधी द्यावा, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्यावतीने तरुणांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासह अनेक मागण्यांसाठी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर येथे आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर सरकारने मागण्यांच्या पूर्ततेसाठी महिन्याची मुदत मागितली होती. ती मुदत संपल्यानंतरही मागण्याबाबत निर्णय न घेतल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले.



    कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियम न पाळल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजी राजे यांनी संतप्त प्रतिक्रया व्यक्त केली आहे. गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांवर गुन्हा का? असा सवाल त्यांनी केला आहे. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का? असा सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

    Rajya sabha MP Sambhaji Raje dares Thackeray – Pawar govt over Maratha reservation issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला