प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक ही आता अवघ्या काही तासांवर आली असताना 32 वर्षांनंतर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक इतकी चुरशीची झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष आपाआपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जंग जंग पछाडत असतानाच निवडणुकीच्या आदल्याच दिवशी एक मोठा ट्विस्ट आला आहे. Rajya Sabha elections: “Quota” of votes reduced; Whose advantage, whose loss ??
– देशमुख मालिकांना परवानगी नाही
सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रसचे मंत्री नवाब मलिक आणि आमदार अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी नाकारल्यामुळे आता या निवडणुकीसाठी दोन मते कमी झाली आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी अपेक्षित मतांचा कोटाही आता कमी झाला आहे. यामुळे आता निवडणुकीतील फायद्या तोट्याची गणितं बदलली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बदललेल्या गणितामुळे कोणाचे पारडे जड होणार, हे पाहणा आता महत्वाचे ठरणार आहे.
– कोटा झाला कमी
राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांना राज्य विधानसभेतील सर्व आमदार मतदान करतात. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या ही 288 इतकी आहे. पण शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे ही संख्या 287 झाली होती. यानुसार राज्यसभेच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी लागणा-या मतांचा कोटा हा 42 इतका होता. पण आता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मत बाद झाल्यामुळे हा कोटा 41 झाला आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्षाकडे असलेल्या शिल्लक मतांमध्ये वाढ होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे याचा फायदा नेमका काणाला होणार, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
– कसे आहे गणित?
शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यामध्ये राज्यसभेची ही लढाई रंगणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे २६ अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना १६ मतांची गरज आहे. तर भाजपकडे २२ अतिरिक्त मते असून, अन्य ७ आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. अशी एकूण २९ मते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपला आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी १३ मतांची गरज आहे. पण आता मतांचा कोटा कमी झाल्यामुळे याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला होणार?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Rajya Sabha elections: “Quota” of votes reduced; Whose advantage, whose loss ??
महत्वाच्या बातम्या
- माझे वडील अयोध्येला गेले, पण शिवसेनेने त्यांचे राजकारणातून उच्चाटन केले; अतुल सावे यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
- गडकरींच्या खात्याचा विश्वविक्रम : 75 किमीचा रस्ता अवघ्या 5 दिवसांत तयार, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
- Crude Oil : सौदी अरेबियाच्या निर्णयामुळे अनेक देशांच्या अडचणी वाढणार, कच्च्या तेलाच्या किमतीमुळे भारतावर मोठा परिणाम
- विधान परिषद : फडणवीसांना धारेवर धरण्याची बक्षिसी; खडसेंना राष्ट्रवादीची उमेदवारी!!