प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायमस्वरूपी नोंदल्या गेलेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल अखेर लागला. या यामध्ये महाविकास आघाडीचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल,इम्रान प्रतापगढी यांनी बाजी मारली आहे. तर भाजपच्या पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक या तिन्ही उमेदवारांनी ही लढाई जिंकली आहे.Rajya Sabha Election: It was a long night game and it was a dramatic turn of events !!
तर शिवसेनेच्या संजय पवार यांचा दारुण पराभव झाल्यामुळे शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा धक्का बसला. पण या संपूर्ण निवडणुकीचा घटनाक्रम नाट्यमय, थरारक आणि रोमहर्षक कसा ठरला हे वाचा.
असा होता घटनाक्रम
शुक्रवार 10 जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात
भाजपचे पिंपरी चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप प्रदीर्घ आजारी असूनही त्यांना एअर लिफ्ट करून मतदानासाठी विधानभवनात आणले
भाजपच्या दुसऱ्या आमदार मुक्ता टिळक आजारी असूनही त्यांना मतदानासाठी रुग्णवाहिकेतून विधानभवनात आणले
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी माध्यमांना महाविकास आघाडीला मते दिल्याची माहिती दिली
एमआयएमनेही महाविकास आघाडीला मते दिल्याची माहिती दिली
नवाब मलिकांची मतदानासाठी जामीन देण्याची याचिका ऐकण्यास उच्च न्यायालयाचा नकार
भाजपचे पराग अळवणी आणि अतुल सावे यांनी सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांनी मतदानाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची विधानसभेत तातडीची बैठक आणि मतांचा कोटा वाढवण्याचा निर्णय
राष्ट्रवादीने ४१ वरून ४४ मतांचा कोटा वाढवला, काँग्रेसनेही कोटा ४३ केला
शिवसेनेचे उमेदवार संजय पवार अडचणीत आल्याने मुख्यमंत्री ठाकरे राष्ट्रवादी-काँग्रेस नाराज
महाविकास आघाडीचा भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणांच्या मतदानावर आक्षेप
आम्ही ज्याला मते दिली तो उमेदवार विजयी होणार बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांचे वक्तव्य
भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव, शिष्टमंडळ आयोगाला भेटले
सायंकाळी ५ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीची प्रक्रिया थांबवली
निवडणूक आयोगाकडून वैध मतांबाबत तपास करण्यात येत असल्याने साडे आठ तास मतमोजणीला स्थगिती
अखेर शिवसेना आमदार सुहासे कांदे यांचे मत बाद करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
मध्यरात्रीनंतर निकाला आधी प्रफुल्ल पटेल यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट
त्यानंतर 284 वैध मतांच्या मोजणीनंतर अखेर निकाल हाती आला.
शिवसेनेला धक्का. भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक विजयी
Rajya Sabha Election: It was a long night game and it was a dramatic turn of events !!
महत्वाच्या बातम्या
- राज्यसभा निवडणूक : रात्रीस खेळ झाला; कोल्हापूरचे संजय घरी गेले; भाजपचे धनंजय महाडिक संजय राऊतांपेक्षाही जास्त मते घेत विजयी!!
- राज्यसभा निवडणूक नवा ट्विस्ट : सर्वच राज्यांतील मतमोजणी आयोगाने थांबवली; राजस्थान – कर्नाटकात क्रॉस व्होटिंग!!
- कोरोना रुग्णांबाबत महाराष्ट्राचा पहिला नंबर : 24 तासांत 2813 पॉझिटिव्ह आढळले; एकट्या मुंबईत 1700 हून अधिक संक्रमित
- राज्यसभा निवडणूक : सुहास कांदे, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मतांवर आक्षेप आणि अहमद पटेल यांची आठवण