• Download App
    नागपुरात काँग्रेसला झटका, आमदारकीचा राजीनामा देत राजू पारवेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश Raju Parve joins Shinde's Shiv Sena after resigning from MLA in Nagpur

    नागपुरात काँग्रेसला झटका, आमदारकीचा राजीनामा देत राजू पारवेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आता विदर्भातील आणखी एका कॉंग्रेस आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी कॉंग्रेसला नागपूरमध्ये ‘दे धक्का’ दिला आहे. काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात आज जाहीर प्रवेश केला आहे. तर त्यांना रामटेकमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. Raju Parve joins Shinde’s Shiv Sena after resigning from MLA in Nagpur

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार कृपाल तुमाने आणि आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत शिंदे गटात छोटेखानी पक्षप्रवेश झाला आहे, अशी माहिती राजू पारवे यांनी दिली.


    नेते राहिनात, पक्ष टिकेना, राजकारण झाले जड; हाती काही उरले नाही, तर भाजपवर खापर फोडून पळ!!


    पारवे धनुष्यबाणावर निवडणूक लढणार?

    राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून ते धनुष्यबाण चिन्हांवर रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटात प्रवेश करताच राजू पारवेंना लोकसभेचं तिकीट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीतमध्ये रामटेक मतदारसंघ शिवसेनेला मिळणार आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी राजू पारवेंनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

    रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे. शिवसेनेचे कृपाल तुमाने हे सध्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. रामटेक मतदारसंघावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे. भाजपला रामटेकची जागा हवी आहे, पण अद्याप निर्णय झालेला नाही.

    खासदार तुमाने हे शिवसेनेकडून सलग तीन टर्मपासून लढत असून दोनदा विजयी झाले आहेत. मात्र, यावेळी भाजपने ही जागा स्वत:कडे खेचण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देणारे खा. कृपाल तुमाने यांना यावेळी चौथ्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

    परंतु, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे उमरेडचे आ. राजू पारवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धरमपेठेतील निवासस्थानी भेट घेतल्यामुळे ‘ट्विस्ट’ आणखीनच वाढला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील रामटेकची जागा सोडण्यास तयार नव्हते. रामटेकशी पक्षाची अस्मिता जुळली आहे.

    Raju Parve joins Shinde’s Shiv Sena after resigning from MLA in Nagpur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार