• Download App
    लोणारच्या राजू केंद्रे यांना मिळाली लंडनची शिष्यवृत्ती |Raju kendre of Lonar Got Landon scholarship

    लोणारच्या राजू केंद्रे यांना मिळाली लंडनची शिष्यवृत्ती

    • शिवेनिंग शिष्यवृत्तीचा मिळाला मान Raju kendre of Lonar Got Landon scholarship

    विशेष प्रतिनिधी

    बुलढाणा : शिक्षणाचा गंध नसलेल्या गावाचा उंबरठा ओलांडत , संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्तीसाठी निवड होण्याचे भाग्य मिळालेय ते म्हणजे लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे येथील २३ वर्षीय राजू केंद्रे या तरुणाला ..

    आपण नेहमीच म्हणतो प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे असतो त्याच्या संघर्षाचा इतिहास,असाच काहीसा प्रवास राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे या तरुणाचा आहे. लंडनची शिवेनिंग शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची मानली जाते,



    आणि या शिष्यवृत्तीसाठी राजू केंद्रे याची निवड झाली. त्यासाठी १६० देशांतील ६३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. देशासह समाजात बदल घडवू पाहणाऱ्या तरुणांना इंग्लंडमध्ये उच्चं शिक्षण घेण्यासाठी जवळपास ४५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळतेय.

    राजूला जगातील १८ नामांकित विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आमंत्रित केले असून , लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे ते लंडन हा शैक्षणिक प्रवासाचा टप्पा राजूने गाठला आहे. यामुळे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचे नाव आता सतासमुद्राबाहेर झळकणार आहे.

    • टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये शिक्षण
    • ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण
    • मेळघाट सारख्या दुर्गम भागात तळमळीने काम
    •  इंग्लंडच्या विद्यपीठात शिक्षणासाठी निघाले
    •  महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री फेलोशिप मिळाली
    •  समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम
    • नेट सेट सारख्या परीक्षा पहिल्याच झटक्यात उत्तीर्ण
    • आय – पॅक संस्थेसोबत काम केले आहे

    बाईट – राजू केंद्रे
    बाईट – आत्माराम केंद्रे , वडील
    बाईट – जिजाबाई केंद्रे , आई

    Raju kendre of Lonar Got Landon scholarship

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस