विशेष प्रतिनिधी
बेंगळुरू : ज्या बस डेपो मध्ये शिवाजी गायकवाड कंडक्टर होते, त्या बंगळूर मधल्या बस डेपोला सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला जुना मित्र राज बहादूर यांच्याबरोबर भेट दिली.Rajinikanth’s reunion at Shivaji Gaikwad bus depot!!
रजनीकांत यांचा जेलर सिनेमा सुपर हिट ठरला. या सिनेमाने जगभर 500 कोटींची कमाई केली. त्यानंतर रजनीकांत यांनी उत्तर प्रदेश मध्ये जाऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यांच्या पाया पडले. त्यामुळे थोडा राजकीय वाद उफाळला. पण त्या वादाकडे रजनीकांत यांनी फारसे लक्ष दिले नाही.
त्यानंतर त्यांनी बंगलोर मध्ये ते स्वतः शिवाजी गायकवाड या मूळ नावाने, ज्या बस डेपोमध्ये कंडक्टर होते, त्या जयनगर बस डेपोला पुनर्भेट दिली. तेथे बंगलोर मेट्रोपोलीटीन ट्रान्सपोर्टच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर फोटो काढले. जुन्या बस डेपोच्या आठवणी त्यांच्याबरोबर शेअर केल्या. तिथल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची रजनीकांत यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. रजनीकांत स्वतः इथे आलेत यावर सुरुवातीला त्यांचा विश्वासच बसत नव्हता.
रजनीकांत हे त्यांचे सिनेमातले नाव आहे. आधी ते शिवाजी गायकवाड म्हणूनच मूळ नावाने बस कंडक्टर म्हणून नोकरी करायचे. तेथेच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि ते दक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळले. पण त्यांचे पाय जमिनीवरच राहिले. आज त्यांनी जुन्या बस डेपोला भेट देऊन ते दाखवून दिले.
Rajinikanth’s reunion at Shivaji Gaikwad bus depot!!
महत्वाच्या बातम्या
- अरुणाचलच्या चीनच्या नव्या नकाशावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची तिखट प्रतिक्रिया, म्हणाले…
- हवेत सोडून पुड्या; विरोधकांच्या गुडघ्याला मुंडावळ्या!!
- ”…आता सोळा केले गोळा आणि स्वतःच स्वतःचा करून घेतला पालापाचोळा” आशिष शेलारांचा ठाकरे गटावर निशाणा!
- जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा कधी मिळणार, निवडणुका कधी होणार? सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नावर केंद्राने दिले उत्तर, म्हटले…