Sunday, 11 May 2025
  • Download App
    Rajesh Tope : संभाजीराजेंच्या भेटीनंतर दोन दिवसांनी पवारांचे निकटवर्ती राजेश टोपे मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला!! | The Focus India

    Rajesh Tope : संभाजीराजेंच्या भेटीनंतर दोन दिवसांनी पवारांचे निकटवर्ती राजेश टोपे मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला!!

    rajesh tope

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इरेला पेटलेले मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. तत्पूर्वी मंगळवारी मध्यरात्री शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे हे काल मध्यरात्री 12.00 वाजता अचानक अंतरवाली सराटी येथे आले. ते काहीवेळ स्टेजवर मनोज जरांगे यांच्यापाशी जाऊन बसले. त्यानंतर राजेश टोपे यांनी जरांगेंच्या काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. तिसऱ्या आघाडीचे नेते संभाजीराजे यांनी दोनच दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर काल अचानक मध्यरात्री 12.00 वाजता राजेश टोपे जरांगे यांच्या भेटीला पोचल्याने राजकीय संशय गडद झाला.  Rajesh Tope

    राजेश टोपे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांच्या तब्येतीची त्यांच्या सहकाऱ्यांपाशी चौकशी केली. त्यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. राजेश टोपे गेल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती फारच खालावत असल्याने आंदोलकांनी सहकाऱ्यांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मध्यरात्री वैद्यकीय उपचार घेतल्याचे समजते. Rajesh Tope


    PMRDA : पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजूरी


    मात्र संभाजीराजे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना तिसऱ्या आघाडीत सहभागी व्हायचे आवाहन केले होते त्यानंतर दोनच दिवसांनी शरद पवारांचे निकटवर्ती राजेश टोपे मध्यरात्री जरांगे यांच्या भेटीला गेले त्यामुळे त्यांच्या भेटीमध्ये नेमके कोणते राजकारण शिजले याविषयी संशयाचे मळभ गडद झाले. Rajesh Tope

    जिल्हाधिकाऱ्यांकडून जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती

    मनोज जरांगे यांनी मंगळवारी मध्यरात्री गावकरी आणि सहकाऱ्यांच्या आग्रहाने वैद्यकी उपचार घेतले. रात्री एकच्या सुमारास त्यांना सलाईन लावण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण नाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगे यांना त्यांना उपचाराला सहकार्य करत उपोषण मागे घेण्याची विनंती देखील केली.

    rajesh tope met manoj jarange at midnight in antarwali sarati

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ