मराठवाड्याने आज पुन्हा एक हीरा गमावला …प्रमोद महाजन, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे… आता दिल्लीत वजन निर्माण करत असलेले राजीव सातव देखील …
मराठवाड्याचे नेते दिल्लीत फारसे रुळत नाहीत आणि रुळले तर त्यांना कोणी टिकू देत नाही अपवाद प्रमोद महाजन आणि शिवराज पाटील चाकूरकर. RAJEEV SATAV: Hingoli stopped …
विशेष प्रतिनिधी
हिंगोली : हिंगोलीचे भूमिपुत्र ,मराठवाड्याचे नेतृत्व राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. अवघ्या ४६ व्या वर्षी राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या निधनाने सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.हिंगोली थांबली आहे आणि मराठवाड्यात शोककळा पसरली आहे.
राजीव सातव यांचा जन्म २१ सप्टेंबर १९७४ साली हिंगोली जिल्ह्यातील मसोड, तालुका कळमनुरी येथे झाला. त्यांच्या आई, रजनी सातव या शरद पवारांच्या मंत्रिमंडळातील मंत्री होत्या. राजीव सातव यांनी आपलं शिक्षण पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून आणि आयएलएस लॉ कॉलेजमधून पूर्ण केलं. २००२ साली त्यांचा विवाह झाला आणि सध्या त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
४५ वर्षीय राजीव सातव हे सध्या कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याकडे सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरात प्रभारी पद होतं. तसंच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक होते.
राजीव सातव यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेतही विजय मिळवण्याची कामगिरी केली होती. त्यांनी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत केलं होतं.
राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. पुढे २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान सातव यांच्यावर गुजरात प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या निवडणुकीत काँग्रेसने चांगलं यश मिळवलं. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली होती.
कॉंग्रेस आणि गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेमुळे त्यांच्यावर गुजरातच्या कॉंग्रेस प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. युथ कॉंग्रेसचे अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे होते.
राजकीय प्रवास
- काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री रजनीताई सातव यांचे चिरंजीव . त्यांनी पुण्यात फर्गुसन कॉलेजमधून एम.ए. तर आय.एल.एस. लॉ कॉलेजमधून एल.एल.एम. केलेले आहे. त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव डॉक्टर आहेत.
- २००९ ते २०१४ या काळात राजीव सावत हिंगोलीचे आमदार होते.
- महाराष्ट्र युवक काँग्रेसचे ते २००८ ते २०१० या काळात अध्यक्ष होते. तर २०१० ते २०१४ या काळात त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविलेले आहे.
- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी राजीव सातव यांच्यासाठी पूर्वनियोजन नसताना सभा घेतली होती. २०१४ च्या मोदी लाटेतही राजीव सातव हे खासदार म्हणून निवडून आले.
- हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला होता. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं .
- गुजरात विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे २०१९ ची लोकसभा निवडणूक ते लढले नाहीत. परंतु राज्यसभेत हुसेन दलवाई यांची जागा रिक्त होताच राहूल गांधी यांनी सातव यांची त्या जागी निवड करत त्यांना वरच्या सभागृहात पाठवले.
RAJEEV SATAV: Hingoli stopped …
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Cases In India : देशातील कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट, २४ तासांत ४ हजारांहून जास्त मृत्यूंमुळे चिंता कायम
- Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दराचा पुन्हा भडका, अनेक शहरांत १०० रुपयांच्या पुढे!
- पुणे तेथे काय उणे! पुणेकर तरुणांच्या स्टार्टअपला केंद्र सरकारची मान्यता ; बनवणार ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन
- Rajeev Satav Death : राहुल गांधींचे अत्यंत जवळचे होते राजीव सातव, चार वेळा पटकावला होता संसदरत्न पुरस्कार