मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या म्हणजेच 14 जून 2021 रोजी आपला 53 वा वाढदिवस साजरा करतायत. त्यांच्या 53 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवी मुंबई मनसेच्या वतीने 53 हजार घरांमध्ये मोफत पुस्तके देण्याचा संकल्प नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी याप्रसंगी केलेला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या म्हणजेच 14 जून 2021 रोजी आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहेत . त्यांच्या 53 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवी मुंबई मनसेच्या वतीने 53 हजार घरांमध्ये मोफत पुस्तके संपूर्ण वर्षभर भेट देण्याचा संकल्प नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केलेला आहे. मराठी 100 पुस्तकांची यादीच मनसेने प्रसिद्ध केलेली आहे. त्यामधील आपल्या आवडत्या पुस्तकाची नोंदणी करण्याचे आवाहन मनसेने केले आहे. RAJ THAKREY BIRTHDAY! Raj Thackeray 53 birthday, MNS Gajanan Kale gift books in 53 thousand houses navi mumbai
कुणाकुणाची पुस्तके भेट देणार, 100 पुस्तकांची यादी
सदरच्या पुस्तकांच्या यादीमध्ये सुप्रसिद्ध लेखक/कवी मंगेश पाडगावकर, प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे, व. पु. काळे, ना. धों . महानोर, आचार्य अत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विजय तेंडुलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, महात्मा गांधी, साने गुरुजी, वि. स. खांडेकर, डॉ. अब्दुल कलाम, सुरेश भट अशा कवी/लेखकांच्या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. यामध्ये श्यामची आई, फकिरा, अग्निपंख, जिप्सी, शूद्र पूर्वी कोण होते, माझी जीवनगाथा, पार्टनर व. पु. काळे, यशवंतराव आणि मी, वाघनखं , सखाराम बाईंडर, माझी जन्मठेप, नटसम्राट, सत्याचे प्रयोग, रंग आणि गंध, रसवंतीचा मुजरा, शिवछत्रपती एक मागोवा अशा अनेक प्रसिद्ध पुस्तकांची यादी आहे.
नवी मुंबई शहरामध्ये वाचन संस्कृती रुजावी याकरिता मनसे प्रयत्न
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मत सांगत असताना गजानन काळे यांनी असे म्हटले आहे की, “राजसाहेब ठाकरे हे सध्याच्या राजकारण व समाजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व असून विविध पुस्तके वाचण्याचा छंद राजसाहेबांना आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे. पुस्तक वाचल्याने प्रगल्भ आणि सक्षम समाज घडवण्यास मोठी मदत होते आणि म्हणूनच नवी मुंबई शहरामध्ये वाचन संस्कृती रुजावी याकरिता नवी मुंबई मनसेचा हा छोटासा प्रयत्न आहे”, असं मत गजानन काळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
वाचनातून लोक सावरतील
कोविड च्या दुसऱ्या लाटेनंतर हळूहळू जीवन पूर्वपदावर येत असताना तसेच या सर्व प्रसंगांमधून नवी मुंबईतील नागरिक जात असताना लॉकडाऊन आणि कोविडच्या संकटामुळे नागरिकांच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. अशा वेळी पुस्तक त्यांना या परिस्थिती मधून बाहेर काढेल असा ठाम विश्वास गजानन काळे यांना आहे.
आवडतं पुस्तक नोंदवा
नवी मुंबई मनसेने या अभियानाची सुरुवात केल्यानंतर काही तासातच १५०० पुस्तकांची नोंदणी नवी मुंबईकरांनी केलेली आहे. तसेच सदर पुस्तकांची नोंदणी करण्याकरिता मनसेने दोन क्रमांक ९०९०५०५०६७ / ८१०८१८१००७ प्रसिद्ध केलेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नागरिक आपले आवडते पुस्तक नोंदवू शकतात.
व्हाट्सअप , क्यू आर कोड, तसेच गुगल लिंकच्या माध्यमातून आपली माहिती देऊन आपले आवडते पुस्तक नागरिक नोंदवू शकतात. नवी मुंबईतील नागरिकांनी मोठ्या संख्येने या वाचन चळवळीत सहभाग नोंदवून वाचन संस्कृती वृद्धांगित करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे.
RAJ THAKREY BIRTHDAY! Raj Thackeray 53 birthday, MNS Gajanan Kale gift books in 53 thousand houses navi mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- नववीनंतर तीन लाख मुलांची गळती, कोरोनाचे शिक्षणावर गंभीर परिणाम
- उत्तर प्रदेशात ग्रामस्थांनी उभारले चक्क कोरोना मातेचे मंदिर, भविकांची दर्शनासाठी रीघ
- संयुक्त किसान मोर्चा करणार देशभरातील राजभवनावर निदर्शने
- Maharashtra Corona Updates : राज्यामध्ये शनिवारी आढळले १०,९६२ नवीन रुग्ण, १४,९१० जणांना डिस्चार्ज; १,५५,४७४ ॲक्टिव्ह रुग्ण
- कोरोनाचा उगम नक्की कोठे, चीन व अमेरिकेत झडू लागल्या पुन्हा वादाच्या फैरी