• Download App
    राष्ट्रवादीनेच जातीपातीचं राजकारण केले; राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे प्रवीण दरेकर यांच्याकडून समर्थन|Raj Thackeray's speech means that the NCP did caste politics, says pravin darekar

    राष्ट्रवादीनेच जातीपातीचं राजकारण केले; राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे प्रवीण दरेकर यांच्याकडून समर्थन

    वृत्तसंस्था

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापनेपासूनच जातीपातीचे राजकारण करून जातीभेदाच्या भिंती उभ्या केल्या आहेत, अशी टीका भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादीनेच जातीपातीचं राजकारण केले, या राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे त्यांनी समर्थनही केले आहे.Raj Thackeray’s speech means that the NCP did caste politics, says pravin darekar

    ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या भूमिकेला, बोलण्याला काहीतरी अर्थ आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पाहिलं तर कुणी जातीपातीचं राजकारण केलं ते सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.



    राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीवादाचा मुद्दा प्रखरतेने समोर आला असं मत मांडलं होतं. राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार वाद पेटला आहे.

    राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचण्याचा सल्ला दिला होता. आता, या वादात भाजपानेही उडी घेतली असून राज ठाकरेंच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे.

    शरद पवार यांनी राज ठाकरेंना प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर, राज ठाकरे यांनी थेट प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार ट्विट करत शरद पवारांना पुन्हा डिवचले आहे. त्यानंतर, आता प्रवीण दरेकर यांनीही राज ठाकरे यांच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, मनसेच्या पहिल्या १३ आमदारांमध्ये प्रवीण दरेकर यांचाही समावेश होता, तेव्हा ते राज ठाकरेंचे शिलेदार होते. आज त्यांनी राज ठाकरे यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.

    राज ठाकरे यांच्या भूमिकेला, बोलण्याला काहीतरी अर्थ आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पाहिल्यास, राष्ट्रवादीच काँग्रेसनेच सर्वाधिक जातीपातीचं राजकारण केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे मला असं वाटत नाही. अशाप्रकारे जातीयवाद फोफावण्याचं काम राष्ट्रवादीनेच केलं, असे म्हणत दरेकर यांनी राज ठाकरे यांची री ओढली. त्यामुळे, आता जातीपातीचा हा राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

    Raj Thackeray’s speech means that the NCP did caste politics, says pravin darekar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस