• Download App
    अंधेरीच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट : राज ठाकरेंची फडणवीसांना "स्पेशल रिक्वेस्ट"; भाजपने ऋतुजा लटकेंना आमदार होऊ द्यावेRaj Thackeray's Special Request to Fadnavis

    अंधेरीच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट : राज ठाकरेंची फडणवीसांना ‘स्पेशल रिक्वेस्ट’; भाजपने ऋतुजा लटकेंना आमदार होऊ द्यावे

    प्रतिनिधी

    मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पेशल रिक्वेस्ट करणारे पत्र पाठवून भाजपने निवडणूक लढवू नये ऋतुजा लटकेंना आमदार होऊ द्यावे अशी सूचना केली आहे. Raj Thackeray’s Special Request to Fadnavis

    राज ठाकरे यांनी काल आणि आज अशा गेल्या दोन दिवसांत ज्या राजकीय हालचाली केल्या आहेत, त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आज मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार त्यांच्या भेटीला शिवतीर्थावर गेले होते. या दोन महत्त्वपूर्ण भेटीनंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना “माय डियर देवेंद्र”, असे संबोधून इंग्लिश मध्ये पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी अंधेरी पोट निवडणुकीसंदर्भातल्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात राज म्हणतात

    आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) या विधानसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होणे यामुळे कै. रमेश लटके यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावे.

    महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगत

    मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचे धोरण स्वीकारतो. तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसे करावे असे मला माझे मन सांगते. असे करणे हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, अशी आशा वाटते, असे राज ठाकरेंनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

    Raj Thackeray’s Special Request to Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस