महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील काही दिवस तिथेच त्यांच्यावर उपचार होणार आहेत.Raj Thackeray’s son Amit infected with corona
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील काही दिवस तिथेच त्यांच्यावर उपचार होणार आहेत.
- ठाकरे ब्रदर्स म्हणतात ‘थँक्यू मोदी’ : उद्धव ठाकरे पाठोपाठ राज ठाकरे यांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
अमित ठाकरेंना मागील काही दिवसांपासून सर्दी आणि ताप जाणवत होता. त्यांची काल चाचणी करण्यात आली असता, ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी दुपारी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज ठाकरेंच्या कुटुंबातील इतर कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत. यापूर्वी उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबातही कोरोनाची लागण झाली आहे.अमित ठाकरे यांचा २७ जानेवारी २०१९ रोजी विवाह झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेच्या कामातही सहभागी होत आहेत.