• Download App
    महाराष्ट्रातील राजकीय महाभूकंपावर, राष्ट्रवादीमधील महाबंडखोरीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... Raj Thackerays reaction to the political earthquake in Maharashtra and the rebellion in the NCP

    महाराष्ट्रातील राजकीय महाभूकंपावर, राष्ट्रवादीमधील महाबंडखोरीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    ‘’पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश…’’ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज महाभूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस  सरकरामध्ये सामील झाले आहेत. एवढच नाही तर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या नऊ दिग्गज आमदरांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  यावर आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत, राज ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. Raj Thackerays reaction to the political earthquake in Maharashtra and the rebellion in the NCP

    राज ठाकरे म्हणतात, ‘’आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला.  उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!’’

    याशिवाय ‘’तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.‘’ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

    याचबरोबर, ‘’बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?’’  असं  राज ठाकरे यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

    Raj Thackerays reaction to the political earthquake in Maharashtra and the rebellion in the NCP

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात

    Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- राज्यात कुठेही हिंदी लादली जात नाही; भारतीय भाषेला विरोध करून इंग्रजीचे गोडवे गाण्याचे वाईट वाटते