• Download App
    एकीकडे राज ठाकरेंची धनुष्यबाणावर लढण्याची तयारी; दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार!! Raj Thackeray's preparation to fight with bow and arrow

    एकीकडे राज ठाकरेंची धनुष्यबाणावर लढण्याची तयारी; दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठे ट्विस्ट येत असून एकीकडे राज ठाकरेंनी मनसेचे इंजिन बाजूला सारून धनुष्यबाणावर लढण्याची तयारी दाखवली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार घातला आहे. याचा सरळ अर्थासाठी शिवसेना नावाची संघटना वेगळ्या मार्गाने विस्तारायला मोकळी झाली आहे. Raj Thackeray’s preparation to fight with bow and arrow

    महायुतीमध्ये सामील होऊन मनसेचे प्रमुख राज ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. त्यानंतर आज मुंबईतल्या मोठ्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची बैठक सुरू आहे. राज ठाकरे हे मनसेचे इंजिन बाजूला सारून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती धरण्याची शक्यता आहे. त्यांच्या पसंतीचे उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लोकसभेच्या निवडणुकीच्या रणमैदानात उतरण्याची शक्यता आहे.



    त्याच वेळी महाविकास आघाडीतले मतभेद अधिक खोलवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर बहिष्कार घालण्याची भाषा काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. सांगलीस – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांच्या भांडणात काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.

    सांगलीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करून सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली होती. परंतु, नंतर त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील यांनी मैदानात पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर करून टाकले. त्यामुळे काँग्रेसचे नेते सांगलीत पुन्हा एकवटले. सांगलीची जागा काँग्रेसच्या हक्काची आहे. ती शिवसेनेला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगत सांगलीतल्या काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला.

    Raj Thackeray’s preparation to fight with bow and arrow

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस