‘..या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे.’ असंही पत्राच्या शेवटी म्हणाले आहेत. Raj Thackerays letter sent by Prime Minister Modi
विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विशेष पत्र पाठवले आहे. ज्यात त्यांनी दिवगंत उद्योजक रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जावे, अशी मागणी केली आहे. शिवाय, हा पुरस्कार देण्याबाबत सरकारचं धोरण काय असलं पाहीजे. यावरही मत व्यक्त केलं आहे.
राज ठाकरे पत्रात म्हणतात, ‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, सस्नेह जय महाराष्ट्र, ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न’सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे , तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही!’
‘काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहीली , मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनीट स्तब्ध उभे राहीले ! आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या ‘भारतरत्न’च नाहीत तर काय मग अजून ?’
‘त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे. तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला.’
Raj Thackerays letter sent by Prime Minister Modi
महत्वाच्या बातम्या
- Hezbollah : हिजबुल्लाहची प्रथमच युद्धविरामाची मागणी; गाझामध्ये युद्ध थांबवण्याची अटही नाही; दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सैनिकांनी फडकावला झेंडा
- North Korea : दक्षिण कोरियासोबतची सीमा बंद करणार उत्तर कोरिया; किम जोंगच्या सैन्याने लँडमाइन्स, अँटी-टँक सापळे लावले
- Kolkata rape-murder case कोलकाता रेप-हत्याप्रकरणी CBIच्या आरोपपत्रात 11 पुरावे; ट्रेनी डॉक्टरने विरोध केला होता, आरोपी संजयच्या अंगावर खुणा
- Haryana : हरियाणात 2 अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा; दिल्लीत घेतली भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट