प्रतिनिधी
मुंबई : 5 जूनचा राज ठाकरे यांचा वादा आणि अयोध्येत पोहोचले मनसेचे अविनाश दादा!! मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शविला होता. उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना आम्ही अयोध्येत पाऊल देखील ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. पण प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरेंना हा अयोध्या दौरा स्थगित करावा लागला. अशातच एक वेगळीच बातमी समोर येत आहे. Raj Thackeray’s June 5 promise; Avinash Dada of MNS reached Ayodhya
आम्हाला कोणीही अडवू शकत नाही
मनसेचे ठाण्यातीस नेते अविनाश जाधव हे आज 5 जूनलि आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहे. अयोध्येत पोहोचल्यानंतर त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतल्याचे फेसबुक लाईव्ह करून ही माहिती दिली. आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. आम्ही ठरवल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट पूर्ण करतोच. बृजभूषण सिंह यांचा कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणीही आम्ही गेलो होतो, तसेच काही वेळापूर्वीच आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे, असे वक्तव्य त्यांनी या फेसबुक लाईव्हमध्ये केल्याचे पाहायला मिळत आहे.
– मराठी माणसाला चॅलेंज करायचे नाही
5 जूनला राज ठाकरे हे अयोध्येत येणार होते, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी ब्रजभूषण सिंह कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येत येणार होते. मनसेचे नेते आणि कार्यकर्ते अयोध्येत आल्यास आम्ही त्यांना शरयू नदीत बुडवू, असा इशाराही ब्रजभूषण सिंह यांनी दिला होता. मात्र, असे असतानाही ते आव्हान स्वीकारत अविनाश जाधव हे थेट अयोध्येत जाऊन पोहोचले. कोणीही मराठी माणसाला चँलेज करायचे नाही. आम्ही आलोय, आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. आम्हाला धमक्या द्यायचे बंद करा. ज्यादिवशी राज ठाकरे आदेश देतील तेव्हा या सगळ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.
Raj Thackeray’s June 5 promise; Avinash Dada of MNS reached Ayodhya
महत्वाच्या बातम्या
- MPSC नोकरीची संधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1085 रिक्त जागांसाठी भरती
- पोस्टात नोकरीची संधी : महाराष्ट्रात 3026 पदांची भरती; आज 5 जून अर्जासाठी शेवटचा दिवस!!
- ही तो श्रींची इच्छा ते बाळासाहेबांची इच्छा!!
- सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांना हवाय राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री; तर सुनील तटकरे म्हणतात देवेंद्र फडणवीस उत्तम!!