पण शाळेत आम्ही ज्याचे चाहते होतो तो म्हणजे अतुल परचुरे.’ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackerays कर्करोगावर यशस्वी मात करूनही ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackerays ) यांनीही एक भावनिक पोस्ट करत अतुल परचुरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.Raj Thackerays
राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘आज आमचा अतुल गेला…. एक उमदा नट आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझा एक जवळचा मित्र गेला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं अतुलचं होतं. आम्ही सगळे बालमोहन शाळेचे विद्यार्थी. आम्ही शाळेत असतानाचा काळ असा होता की सिनेमाच्या जगातले राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना हे आमचे शाळेबाहेरचे हिरो पण अर्थात आमच्यापासून मैलांवरचे असलेले हिरो किंवा आम्ही त्यांचे चाहते म्हणू. पण शाळेत आम्ही ज्याचे चाहते होतो तो म्हणजे अतुल परचुरे. तो त्या काळात बजरबट्टू नावाच्या नाटकात काम करायचा . शाळेत असताना पण तो उस्फुर्त आणि उमदा नट. अतुल हा जन्मजात अभिनेता असं म्हणणं वावगं ठरणार नाही.’
‘शाळेत असताना त्याचा आणि माझा फारसा मैत्र नव्हता, पण आमच्या साठी तो तेव्हाच एक सेलिब्रिटी होता ! कॉलेजला गेल्यावर जरी आमची कॉलेजेस वेगळी होती तरी आमची मैत्री झाली आणि ती घट्ट पण होत गेली. अतुल हा खरा रंगकर्मी. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली अशा नाटकांमध्ये अतुलने जे काम केलं अफाट होतं. बरं अतुल इतका नशीबवान अभिनेता की, त्याचं व्यक्ती आणि वल्ली मधलं काम पु.ल. देशपांड्यांनी फक्त पाहिलं नाही तर त्याला दाद देखील दिली. ‘
‘मी जेंव्हा पक्ष स्थापन केला, तेंव्हा अतुलने पक्ष सदस्यत्वाचा फॉर्म देखील भरला होता. तेंव्हाच्या राजकीय परिस्थितीत एखाद्या कलाकाराने असं पाऊल उचलणं हे धाडस होतं, पण ते त्याने दाखवलं. तो पुढे माझ्या कुटुंबाचा भाग बनला होता. कायम आनंदी, जरा जास्तच गुटगुटीत असा हा आमचा मित्र, ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो, असा अतुल जेंव्हा कर्करोगाशी झुंज देऊन बाहेर आला, आणि जेंव्हा तो खंगला होता, तेंव्हा तो आमच्या मित्रांपैकी कोणालाच बघवत नव्हता. पण अशा अवस्थेत सुद्धा तो आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होता.’
‘मी म्हणलं तसं अतुल हा प्रतिभावान कलावंत होता आणि वृत्तीने आनंदी होता. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपट केले, टीव्ही मालिका केल्या, हिंदीत पण त्याने अनेक टीव्ही शो केले पण अतुल हा खरा रंगकर्मी. त्याचा रंगमंचावरचा वावर, त्याच्या विनोदाच्या टाईमिंगचा असलेला सेन्स सगळंच अप्रतिम होतं. अभिनयावर कमालीचं प्रेम असलेल्या अतुलने अकाली ‘एक्झिट’ घेतली, पण जाताना रंगभूमीपासून, सर्व मित्रांच्या आयुष्यातलं काही तरी निखळलं ही भावना ठेवून गेला. आमच्या या मित्राला माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.’
Raj Thackerays emotional post on Atul Parchures death
महत्वाच्या बातम्या
- Atul Parchure कर्करोगावर यशस्वी मात करूनही अतुल परचुरे यांची एक्झिट
- Bahraich violence : उत्तर प्रदेशातील बहराइच हिंसाचारात तरुणाच्या मृत्यूनंतर प्रकरण तापले!
- Baba Siddiqui : 2000 कोटींचा SRA घोटाळा, बाबा सिद्दिकीची 464 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; हत्येचा वेगळ्या पैलूंच्या आधारे देखील तपास!!
- Vidhan Parishad : रामराजेंचे दोन डगरींवर हात; संजीवराजेंना पवारांकडे पाठवून स्वतःची विधान परिषदेची आमदारकी टिकवण्यासाठी अजितदादांनाच