• Download App
    Uddhav Thackeray राज ठाकरेंचा सावध पवित्रा, पण राज बरोबर आल्याचा उद्धव ठाकरेच लावताहेत धोषा!!

    राज ठाकरेंचा सावध पवित्रा, पण राज बरोबर आल्याचा उद्धव ठाकरेच लावताहेत धोषा!!

    नाशिक : राज ठाकरेंचा सावध पवित्रा, पण राज बरोबर आल्याचा उद्धव ठाकरेच लावत आहेत धोषा!!, असे राजकीय चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेय. Uddhav Thackeray

    हिंदी सक्तीला विरोध आणि मराठीला पाठिंबा या मुद्द्यावर दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरे यांनी जास्त सावध पवित्रा घेतला. त्यांनी आपल्याच नेत्यांवर महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे यांच्या युती बद्दल जाहीर विधान करायला प्रतिबंध घातला. पण याच दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मनसे बरोबर युती करण्याची जाहीर मनिषा बोलून दाखवली. उद्धव ठाकरे यांनी देखील त्याला दुजोरा दिला.

    सामनातून 19 आणि 20 जुलै रोजी प्रसिद्ध होणाऱ्या मुलाखतीचा टिझर संजय राऊत यांनी सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी राज बरोबर आल्याचे वक्तव्य केले. खुद्द राज ठाकरेंनी मात्र त्याला कुठला दुजोरा दिला नाही.

    त्यावर राज ठाकरे यांनी आपल्याच नेत्यांवर जाहीररीच्या कुठले भाष्य करायला बंदी घातली. त्याचबरोबर मनसे एकटे लढायला तयार असल्याची वातावरण निर्मिती देखील चालविली. नाशिक जवळच्या इगतपुरी मध्ये मनसेच्या नेत्यांसाठी तीन दिवसांचे शिबिर आयोजित केले. त्याबद्दलही कुठे जाहीर वाच्यता केली नाही. राज ठाकरे यांनी मनसेचे सगळे राजकीय नियोजन स्वतः एक हाती करण्याचे ठरविले. मनसे मध्ये कुणी आले, कुणी गेले याविषयी देखील त्यांनी बिलकुल जाहीरपणे कुठले भाष्य केले नाही.

    पण याच दरम्यान आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या अन्य नेते मनसे बरोबर महापालिका निवडणुकीत मनसे बरोबर युती होणार हे गृहीत धरून चालले. त्यांनी तशी जाहीर वक्तव्ये केली. त्याचाच पुढचा भाग म्हणून उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत राज बरोबर आल्याचे वक्तव्य केले. ठाकरे म्हणजे संघर्ष त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून शिवसेनाप्रमुखांपर्यंत आणि त्यानंतर आपल्यापासून आदित्य यांच्यापर्यंत सगळ्यांनी संघर्ष केल्याचे त्यांनी नमूद केले त्या पलीकडे जाऊन राजही आता आपल्याबरोबर आल्याचे त्यांनी सांगितले.

    याचा सरळ राजकीय अर्थ‌ असा की आता उद्धव ठाकरे राज यांच्याबरोबर युती करायला उत्सुक झालेत पण राज मात्र सावध पवित्रा घेत सध्या तरी शांत बसलेत युतीचा निर्णय नोव्हेंबर डिसेंबर मध्ये घेऊ असे त्यांनी मध्यंतरी सूचित करून झाले. राज ठाकरे यांनी या राजकीय खेळीतून शिवसेनेची मनसेच्या मागे फरफट होऊ दिली.

    Raj Thackeray’s cautious stance, but Uddhav Thackeray is spreading the lie that Raj is coming with him

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bombay Stock : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारत उडवून देण्याची धमकी, चार आरडीएक्स बाँब ठेवल्याचा मेल

    जयंत पाटलांचा “अडथळा” सरताच पवारांच्या घरातच पदांची वाटणी; मुख्य सचिव पदी रोहित पवारांची वर्णी; अख्खी राष्ट्रवादी पवार कुटुंबाच्या सावटाखाली!!

    2633 दिवसानंतर जयंत पाटलांचा राजीनामा; 10 आमदारांचा पक्ष मोठा करण्यासाठी नव्या प्रदेशाध्यक्षांचा प्रस्ताव मांडला!!