• Download App
    राज ठाकरेंना मुख्यमंत्री पदी बघायला आवडेल; "गृहमंत्र्यांचे" सूचक उद्गार| Raj Thackeray would like to see CM; A suggestive exclamation of "Home Minister".

    राज ठाकरेंना मुख्यमंत्री पदी बघायला आवडेल; “गृहमंत्र्यांचे” सूचक उद्गार

    प्रतिनिधी

    मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर शिवसेना भवनसमोर झळकवले जात असताना, आता खुद्द राज यांच्या पत्नीनेच त्यांना मुख्यमंत्री पदी बघायला आवडेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
    Raj Thackeray would like to see CM; A suggestive exclamation of “Home Minister”.



    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी रवाना होत असताना माध्यमांनी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या म्हणाल्या, राज्यातील सर्वसामान्य माणसाला कुठल्याही प्रकारची समस्या येते, तेव्हा ते राज ठाकरे यांच्याकडे येतात. त्यामुळे ते लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. राज यांनी जी ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर मांडली आहे, ती पूर्णत्वास न्यायची असेल, तर त्यांना मुख्यमंत्री व्हायला लागेल, असेही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

    शिवसेना भवनसमोर लागलेल्या बॅनरसंदर्भात अमित ठाकरे यांना विचारले असता, असे पोस्टर याआधी देखील लावण्यात आले होते, यापुढेही लागत राहतील, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

    Raj Thackeray would like to see CM; A suggestive exclamation of “Home Minister”.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!