प्रतिनिधी
मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची पुरती कोंडी झाली आहे. भाजपचे नेते शिवसेनेवर रोज “जनाब सेना” असा शाब्दिक हल्ला चढवत आहेत. शिवसेना-भाजपच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना दिसते आहे. परंतु महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी घरोबा केल्यामुळे शिवसेनेच्या प्रत्युत्तरांना जुनी हिंदुत्वाची धार उरलेली नाही. याचा राजकीय लाभ उठवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता जहाल हिंदुत्वाच्या दिशेने निघाली आहे. त्यामुळेच राज ठाकरे उद्याच्या गुढीपाडवा मिळाव्यात आपल्या अयोध्या दौऱ्याच्या तारखेची घोषणा करणार असल्याचे समजत आहे. Raj Thackeray: Towards MNS extremist Hindutva; Raj Thackeray to announce Ayodhya tour date for Gudipadva !!
महाविकास आघाडीच्या सरकारचे नेतृत्व टिकवण्याच्या भूमिकेमुळे हिंदुत्वा बाबत नेहमीची कठोर भूमिका घेताना शिवसेनेची कोंडी झाली आहे. या कोंडीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित अयोध्या दौऱ्याची तारीख येत्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित मेळाव्यात जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित मेळाव्यात अयोध्येला आपण का जायचे, ही भूमिकाही राज ठाकरे जाहीर करणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करताना केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या वापराबाबतही ते भाष्य करणार असल्याची शक्यता आहे.
– मनसे जहाल हिंदुत्वाच्या दिशेने
गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे अयोध्येला जाणार, असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र कोरोना निर्बंधामुळे त्यांचा दौरा लांबणीवर गेला होता. आता कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्याची तारीख शनिवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्यावरून जाहीर प्रखर भूमिका घेण्यात अडचण आहे. ही शिवसेनेची कोंडी झाली असल्याने हीच संधी साधत मनसे जहाल हिंदुत्वाची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.
Raj Thackeray : Towards MNS extremist Hindutva; Raj Thackeray to announce Ayodhya tour date for Gudipadva !!
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख, सचिन वाझेंचा ताबा आता सीबीआयकडे; सुप्रीम कोर्टाने फेटाळली ठाकरे – पवार सरकारची याचिका
- Modi Pariksha Pe Charcha : ऑनलाईन अभ्यासात सोशल मीडियातील रिल्स पाहण्यात वेळ नका घालवू; पंतप्रधान मोदींचा सल्ला!!
- यंदाचा हा मार्च महिना देशाच्या इतिहासात दुसरा सर्वात तप्त महिना ठरला
- व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, २५० रुपयांनी वाढ, घरगुतीचे दर जैसे थे; सामान्य ग्राहकांना दिलासा
- महागाई विराेधात भाष्य न करता भाजपचे नेते लपून बसले – बाळासाहेब थाेरात
- ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी पुण्यात उदघाटन