‘’पुढे यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी…’’ असंही राज ठाकरे यांनी ट्वीटद्वारे सांगितलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्या राज्यभर जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी पावसाळ्यातील आपत्तीही घडताना दिसत आहेत. अशाचप्रकारे रायगडमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. येथील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळली असून, प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर अनेकजण जखमी झाले आहेत. याशिवाय, अनेकजण अद्यापही ढिगाऱ्याखाली दबलेले असल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेने माळीण दुर्घटनेच्या वाईट आठवणी जाग्या झाल्या आहेत. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. Raj Thackeray targeted the administration over the incident of landslide in Irshalwadi of Raigad district
राज ठाकरे म्हणतात, ‘’रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं.’’
याशिवाय ‘’खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा.’’ असेही राज ठाकरे यांनी ट्वीटद्वार सांगितले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे या गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सरकार तुमच्या पाठिशी असून तुम्हाला लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगून आश्वस्त केले.
तसेच ही दुर्घटना भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम ठिकाणी घडल्याने हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्याच्या सूचना दिल्या. सध्या एनडीआरएफची पथके याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत असून त्यांच्या कामाचा आढावा देखील यावेळी घेतला. तसेच हे मदतकार्य वेगाने व्हावे यासाठी निर्देश दिले.
Raj Thackeray targeted the administration over the incident of landslide in Irshalwadi of Raigad district
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटक विधानसभेतून भाजपचे 10 आमदार निलंबित; भाजप आणि जेडीएसने अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवला
- द फोकस एक्सप्लेनर : 11 पक्षांचे 91 खासदार NDA आणि ‘I.N.D.I.A.’ दोन्हींपासून अंतर राखून, तेच किंगमेकर बनणार? वाचा सविस्तर
- ऑस्ट्रेलियन समुद्रकिनाऱ्यावर सापडलेली ‘त्या’ रहस्यमयी वस्तूबाबत ‘ISRO’ प्रमुख सोमनाथन यांचं मोठं विधान, म्हणाले…
- व्हिडिओ कांडात अडकलेल्या किरीट सोमय्यांच्या मदतीला आले जितेंद्र आव्हाड!!