प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज लोकमत मॅन ऑफ द इयर मुलाखतीत परखड भाष्य केले. यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना जेवढे बाहेर लक्ष देताय, त्यापेक्षा अधिक काकांवर लक्ष ठेवा, असा खोचक पण मोलाचा सल्ला दिला आहे. Raj Thackeray suggests ajit Pawar to keep eye on sharad Pawar’s political movements
लोकमतच्या मॅन ऑफ द इयर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची खास मुलाखत घेतली. त्यावेळी या दोघांनीही विचारलेल्या प्रश्नांना राज ठाकरे यांनी उत्तरे देत चौफेर टोलेबाजी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही काय सल्ले द्याल?, असे विचारल्यावर राज ठाकरे यांनी प्रत्येकाला वेगवेगळे सल्ले दिले. एकनाथ शिंदेंना तुम्ही जपून राहा, असे म्हणाले. देवेंद्र फडणवीसांना बाबत “वरती” लक्ष द्या, असा सल्ला दिला, तर सगळ्यात मोठा सल्ला त्यांनी अजितदादांना दिला. अजितदादा सगळ्या सध्या जेवढे बाहेर बघतायेत त्यापेक्षा त्यांनी काकांकडे जास्त लक्ष दिले पाहिजे, असा खोचक पण मोलाचा सल्ला राज ठाकरेंनी अजितदादांना दिला.
अजित पवारांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत स्वतःची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याची जोरदार चर्चा आहे. पण त्या पलीकडे जाऊन आजच शरद पवारांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोस्टर लावण्याचा वेडेपणा करू नका, असा टोला हाणला आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अजित दादांना बाहेर लक्ष देत आहात, त्यापेक्षा जास्त लक्ष काकांकडे द्या, हा सल्ला दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Raj Thackeray suggests ajit Pawar to keep eye on sharad Pawar’s political movements
महत्वाच्या बातम्या
- लव्ह जिहादचा प्रचार करणाऱ्या व्हायरल जाहिरातीवर VIP बॅग्जचा खुलासा जाहीर, त्याच्याशी कोणताही संबंध नाकारला
- रिफायनरी साठी नाणार ऐवजी बारसूची जागा निवडली ठाकरे – पवार सरकारनेच; उद्धव ठाकरेंनी मोदींना लिहिलेले पत्र व्हायरल!!
- ठाकरे – पवारांनी टेनिस मॅच खेळण्याएवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणे सोपे उरलेय का??; खरे “पंच” तर बसलेत दिल्लीत!!
- दादरा आणि नगर हवेलीला पंतप्रधान मोदींनी दिली पाच हजार कोटींच्या योजनांची भेट