या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्याबद्दलही शेलारांनी नाराजी व्यक्त केली आहे.Raj Thackeray should also be invited to Prabodhankar’s book publishing program, Ashish Shelaran’s direct letter to CM
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आसजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राज ठाकरेंना आमंत्रित करायला हवं होतं, असं मत शेलारांनी पत्रातून व्यक्त केलं आहे.
या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्याबद्दलही शेलारांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला प्रथेप्रमाण विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित केलं असतं, तर अधिक आनंद झाला असता अस देखील आशिष शेलार पत्रात म्हणाले.
ज्या ज्या वेळी राज ठाकरे यांना भेटतो, त्या त्या वेळी त्यांच्या तोंडून प्रबोधनकारांचे ज्याज्वल्य विचार ऐकायला मिळतात. अद्यापही या कार्यक्रमाच निमंत्रण त्यांना देता येईल. या व्यासपीठावर राज ठाकरे आले तर एक संस्मरणीय सोहळा महाराष्ट्राला पाहता येईल, असं शेलारांनी पत्रात म्हटलं आहे.
प्रबोधनमधील प्रबोधनकार या ग्रंथ प्रकाशनावरून नाराजीनाट्य रंगण्याची सुरूवात झाली आहे. विरोधीपक्ष नेत्याला निमंत्रण नाही ते ठिकय पण किमान प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा आणि व्यासंग असणाऱ्या राज ठाकरे यांना बोलवायला हवं, असं आशिष शेलार म्हणाले.
Raj Thackeray should also be invited to Prabodhankar’s book publishing program, Ashish Shelaran’s direct letter to CM
महत्त्वाच्या बातम्या
- दुर्गा देवीची भव्यदिव्य रांगोळी साकारली ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेलेली ही नयनरम्य दृश्य
- नितेश राणेंची शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका ; म्हणाले – ‘मी नाही त्यातली,आणि कडी लावा आतली’
- प्राप्तीकर विभागाच्या महाराष्ट्रातल्या छाप्यांमध्ये उघड झाले 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न
- नाही म्हणणारे पवारच राज्य सरकार पाडतील निलेश राणे यांची जोरदार टीका