विशेष प्रतिनिधी
मुंबई – वाढता कोविड – अपूरी यंत्रणा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र यांना पत्र लिहून राज्यातील स्थितीचा आढावा घेत काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. raj thackeray putforth 5 demands in a letter to PM narendra modi
‘देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असताना लॉकडाऊनसारखे पर्याय अवलंबले जात आहेत.
ते आता राज्याला परवडणारे नाहीत. मात्र राज्याला लसींचा पुरवठा होत नसल्याने पर्याय तरी काय उरतो?’ असे म्हणत राज ठाकरे यांनी कोरोना लसी आणि इतर सुविधा यांबाबत पंतप्रधान मोदी यांच्याकडे 5 मागण्या केल्या आहेत.
- महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करण्याची परवानगी द्यावी
- सिरमला महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लस विकण्याची परवानगी द्यावी
- राज्यातील इतर खासगी संस्थांना लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी
- लसीचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी हॉपकिन्स आणि हिंदुस्थान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी
- राज्याला प्राणवायू आणि रेमडेसिवीर यांचा आवश्यक पुरवठा करता यावा म्हणून मोकळीक द्यावी अशीही विनंती.
या त्या ५ मागण्या आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या कालच्या संबोधनात पंतप्रधानांकडे लोकांना वैयक्तिक मदतीची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच कोरोनाला नैसर्गिक आपत्ती मानून त्या निकषांनुसार लोकांना वैयक्तिक मदत देण्यात यावी, असाही मुख्यमंत्र्यांच्या मागणीचा सूर होता.
raj thackeray putforth 5 demands in a letter to PM narendra modi
विशेष बातम्या
- मुख्यमंत्र्यांकडून अखेर महाराष्ट्रात १५ दिवसांच्या १४४ कलम संचारबंदीची घोषणा, एकूण ५४०० कोटी रूपयांचे पॅकेजही जाहीर
- शाळा, कॉलेज, मंदिरे, मॉल, क्लासेस, जिम, सलून्स, ब्यूटी पार्लस, थिएटर, बागा, शूटिंग सगळे बंद; इ कॉमर्स सेवा सुरू; अन्नाच्या पार्सल सेवा सुरू
- महाराष्ट्रात ५४०० कोटींचे पॅकेज; नैसर्गिक आपत्तीचे निकष लावून लोकांना वैयक्तिक स्वरूपाची मदत देण्याची मुख्यमंत्र्याची पंतप्रधानांकडे मागणी
- वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी सवलती ठाकरे – पवार सरकारने जाहीर केल्या नाहीत ; – विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
- अक्षयकुमार आणि सचिनने हॉस्पिटल बेड अडवून ठेवण्याची गरज नव्हती, त्यांनी घरीच उपचार घ्यायला हवे होते; अस्लम शेख यांची शेरेबाजी