कोरोना महामारीमुळे लांबलेल्या महापालिका निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी आणि सोमवार असे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते मनसे शहर कार्यालयाचे उद्घाटन, मनसेचे प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. दुसरीकडे, 16 ते 18 जुलैदरम्यान राज ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यांमुळे मनसैनिकांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. Raj Thackeray Pune Visit For Upcoming Pune MNC Elections
विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोना महामारीमुळे लांबलेल्या महापालिका निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी आणि सोमवार असे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते मनसे शहर कार्यालयाचे उद्घाटन, मनसेचे प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. दुसरीकडे, 16 ते 18 जुलैदरम्यान राज ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यांमुळे मनसैनिकांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे.
पुण्यातील मनसेची कार्यकारिणी बदलून शहराध्यक्षपदी वसंत मोरी यांची नियुक्ती काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी केली होती. पुढच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मनसेने कार्यकारिणीत अमूलाग्र बदल केला आहे. आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरे यांना शहराध्यक्षपद देण्यात आलं आहे. आधीचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Raj Thackeray Pune Visit For Upcoming Pune MNC Elections
महत्त्वाच्या बातम्या
- आसामच्या मुख्यमंत्र्यांचे सावरकरवादाकडे दमदार पाऊल…!!
- लष्करातील महिलाशक्ती काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात लढणार, आसाम रायफल्सच्या महिला सैनिकांवर जबाबदारी
- राहूल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचे बैलांनाही आवडले नाही, देवेंद्र फडणवीस यांचा टोला
- केवळ बरोबर चालले म्हणून कर्नाटक कॉँग्रेसच्या अध्यक्षाने एकाच्या कानशिलात लगावली
- स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनला मिळणार जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन सूचीत स्थान मिळणार