• Download App
    Raj Thackeray स्टेजवर बगला खाजवून हिंदूंचा अपमान; पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते म्हणाले, राज ठाकरे तर माणूस "हिंमतवान"!!

    Raj Thackeray स्टेजवर बगला खाजवून हिंदूंचा अपमान; पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते म्हणाले, राज ठाकरे तर माणूस “हिंमतवान”!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : स्टेजवर बगला खाजवून हिंदूंचा अपमान पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते म्हणाले, राज ठाकरे तर माणूस “हिंमतवान”!! मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या एकोणिसाव्या वर्धापन दिन सोहळ्यात पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन स्टेजवर बगला खाजवल्या. कुंभमेळ्यावरून हिंदूंचा अपमान केला. हट, मी नाही पिणार गंगेचे पाणी!!, असे राज ठाकरे म्हणाले. त्याबरोबर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राज ठाकरेंच्या समर्थनात उतरले. त्यांनी राज ठाकरे यांना हिंममवान असल्याचे सर्टिफिकेट देऊन टाकले.

    प्रयागराज च्या महाकुंभमेळ्यात तब्बल 63 कोटी हिंदूंनी गंगेमध्ये स्नान केले. त्यामुळे कुठल्याही एका सार्वजनिक समारंभात प्रचंड जमुदाय एकाच ठिकाणी जमण्याचे वर्ल्ड रेकॉर्ड बनले. ते कोट्यावधी हिंदू स्वयंसेवकांनी विविध प्रकारच्या सेवा दिल्या. एखाद दुसरा अपवाद वगळता प्रयागराजचा कुंभमेळा कमाली बाहेर यशस्वी ठरला. राज ठाकरे यांना हे यश दिसले नाही, उलट त्यांना मळलेली गंगा दिसली. म्हणूनच त्यांनी मनसे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बाळा नांदगावकर यांना उद्देशून मी गंगेचे पाणी पिणार नाही, असे उद्गार काढले. आत्ताच कुठे कोरोना गेलाय, उगाचच ते दूषित पाणी पिऊन रोगराई वाढायला नको, असे राज ठाकरे म्हणाले.

    राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजपच्या नेत्यांनी सडकून टीका केली. राज ठाकरे यांना कुंभमेळ्याचे यश सुनावले. पण कुंभमेळ्यावर टीका करून राज ठाकरे यांनी हिंदूंचा अपमान केलाय हे लक्षात आल्याबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आमदार अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. राज ठाकरे हिंमतवान माणूस असल्याचे मिटकरी आणि आव्हाड म्हणाले. त्यासाठी त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या समाजसुधारणेचा दाखला दिला.

    पण याच राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर जातीयवाद वाढवल्याची टीका केली होती. महाराष्ट्र प्रत्येकाला पूर्वी जातीचा अभिमान होताच पण इतर जातींचा द्वेष नव्हता. शरद पवारांची राष्ट्रवादी स्थापन झाली आणि इतर जातींचा द्वेष वाढला असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावेळी मात्र मिटकरी आणि आव्हाड यांच्यासारखे नेते राज ठाकरेंवर तुटून पडले होते. पण राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यावरून हिंदूंचा अपमान करतात हेच मिटकरी आणि आव्हाड त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

    Raj Thackeray insulted Hindus over Kumbh Mela, NCP SP supports him

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस