… अन्यथा ह्या देशात अराजकच माजलं असतं. असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील अनेक दशकं भारतीयच नव्हे तर जगभरातील रसिकांना आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि कोट्यवधी श्रोत्यांच्या मनावर अधीराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ ख्यातनाम गायिका आशा भोसले यांचा आज नव्वदावा वाढदिवस आहे. आपल्या लाडक्या गायिकेला शुभेच्छा देण्यासाठी देशभरातील त्यांचे चाहते विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आशा भोसले यांच्याशी खास ऋणानुबंध असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. Raj Thackeray extended special wishes to veteran singer Asha Bhosle on her 90th birthday.
राज ठाकरे म्हणतात, ”आज आशाताईंचा नव्वदावा वाढदिवस. मागचं शतक अद्वितीय होतं, काय माणसं जन्माला आली त्या शतकांत. प्रतिभा ओसंडून वाहत होती असं वाटावं इतकी ती चहुबाजुंनी समोर येत होती. त्या प्रतिभेचे दोन सर्वोच्च आविष्कार म्हणजे लता दीदी आणि आशा ताई. त्यात दीदींचा आवाज तुम्ही कुठेही ऐकलात तरी क्षणात आत, खोल नेणारा, कुठेतरी मुळापासून गदागदा हलवणारा, घुसळून टाकणारा, खोल आत नेऊन त्याच्याशी सख्य करायला लावणारा.”
याचबरोबर ” पण आशाताईंचा आवाज मात्र तुम्हाला जमिनीवर आणतो, पुन्हा मर्त्य जगात आणतो. माणूस म्हणला की प्रेम, वासना, झुगारून देणं, तडफडण हे सगळं आलंच, ह्या प्रत्येक भावनेचा आविष्कार आशाताईंच्या आवाजातून प्रकट होताना दिसत राहिला. म्हणून मी नेहमी म्हणतो की लतादीदी, आशाताई, भीमसेन अण्णा, किशोरीताई आमोणकर, कुमार गंधर्व ह्यांच्यासारखे दैवीस्पर्श लाभलेले, तसंच अनेक गुणी संगीतकार, लेखक, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, चित्रकार, शिल्पकार, हे जर भारतात जन्मले नसते तर भारताला वेड लागायची वेळ आली असती. अतिशयोक्ती वाटेल, पण ही माणसं होती, त्यांची कला होती म्हणून आसपास इतक्या वाईट गोष्टी घडताना पण जगण्याचं बळ मिळालं. अन्यथा ह्या देशात अराजकच माजलं असतं. ” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
याशिवाय ”वर म्हणलं तसं तो प्रतिभा ओसंडून वाहण्याचा काळ होता, आता ते सगळं कुठेतरी रितं झाल्यासारखं वाटतंय. पण काळ असाच असतो. हे रितेपण किती, तर आज देखील संगीताचे जे काही शोज टीव्हीवर दिसतात, त्यात जी गाणी गायली जातात ती देखील त्याच काळातील, ह्याच गायक आणि संगीतकारांची असतात. ह्यावरूनच ह्या गायक आणि संगीतकारांपुढे किती मोठं आव्हान आहे हे जाणवतं. अर्थात ह्या रितेपणाचं दुःख मला नाही कारण मी ह्या दोघींना ऐकलं आहे, अनुभवलं आहे आणि प्रत्यक्ष असंख्य वेळा पाहिलं आहे. जर पुन्हा भारतात कधी प्रतिभेचा बहर येणार असेल, तर ज्या माणसांच्या रूपाने तो बहर येईल, त्यांचा पिंड आशाताईं सारख्यांच्यामुळेच घडेल ह्याबद्दल शंकाच नाही. आशाताई नव्वद इत्यादी आकडे हे सामान्यांसाठी असतात, तुम्हाला ‘शंभरीपार’ला पर्याय नाही. आशाताईंना वाढदिवसाच्या माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा.” असं म्हणत राज ठाकरे यांनी आशा भोसले यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Raj Thackeray extended special wishes to veteran singer Asha Bhosle on her 90th birthday
महत्वाच्या बातम्या
- ग्राहक न्यायालयाचा बिस्किट कंपनीला दणका, पाकिटात 1 बिस्किट कमी निघाल्याने 1 लाखांचा दंड
- बाबर – औरंगजेबाच्या अत्याचारांनी जो संपला नाही, तो सनातन धर्म हे तुच्छ लोक काय संपवणार??; योगी आदित्यनाथांचा अंगार!!
- कूलिंग ऑफ पीरियडची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने म्हटले होते- न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर 2 वर्षे राजकीय पद घेऊ नये
- बंगालच्या राज्यपालांचा खुलासा- 5 कुलगुरूंना धमक्या आल्या; विद्यापीठांना भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याचा निर्धार