• Download App
    राज ठाकरे यांनी केलं वहिदा रहमान यांचं खास अभिनंदन, म्हणाले... Raj Thackeray congratulated Waheeda Rehman

    Dadasaheb Phalke Award : राज ठाकरे यांनी केलं वहिदा रहमान यांचं खास अभिनंदन, म्हणाले…

    वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार  यंदा जेष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना जाहीर झाला आहे.  दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. या घोषणेनंतर सर्वचस्तरातून वहिदा रहमान यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील  वहिदा रहमान यांच खास अभिनंदन केलं आहे. Raj Thackeray congratulated Waheeda Rehman

    राज ठाकरे म्हणतात, ”वहिदा रहमान ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. १९५६ ला राज खोसला ह्यांच्या ‘सीआयडी’ सिनेमातून करिअरला सुरुवात करत ते आजच्या तारखेपर्यंत सक्रिय असणाऱ्या वहिदाजी ह्या भारतीय सिनेमाचा जवळपास ६० वर्षांचा इतिहास आहे. तुम्ही जे निवडता, त्यावर तुमची श्रद्धा असेल आणि कामाप्रती निष्ठा असेल तर तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून तुमचे नियम लोकांना स्वीकारायला लावू शकता हे वहिदाजींनी दाखवून दिलं.”

    याचबरोबर ”पहिल्याच सिनेमात त्यांनी एका सीनसाठी मी वेडेवाकडे कपडे घालून शॉट देणार नाही असं ठासून सांगितलं. पहिलाच सिनेमा आहे, डायरेक्टर जे सांगेल ते ऐकलं पाहिजे इत्यादी गोष्टींना बाजूला सारत, मी जर ह्या क्षेत्रांत टिकणार असेन तर माझ्या तत्वांशी मी तडजोड करणार हे नाही हे सांगणं सोपं नाही, पण ते वहिदाजींना जमलं. स्वतःचं मुस्लिम नाव आडनाव पण लपवण्याच्या भानगडीत त्या कधी पडल्या नाहीत आणि त्यांचं हिंदुस्थानीपण इतकं पक्क होतं की त्यांचा धर्म लोकांच्या मनाला शिवलं पण नाही.” असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

    याशिवाय,  ”अशा व्यक्तीला हा सन्मान मिळणं ह्यासारखी आनंदाची गोष्ट नाही, अर्थात वहिदाजीच नाहीत तर कुठल्याही कलाकाराला हे पुरस्कार थोडे आधी मिळायला काहीच हरकत नाही. पण असो. वहिदाजींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतफे मनःपूर्वक शुभेच्छा !” अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी वहिदा रहमान यांचे अभिनंदन केले आहे.

    Raj Thackeray congratulated Waheeda Rehman

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना ‘बॅलेट पेपर’वरही भाेपळा, बेस्ट साेसायटीत दारुण पराभव

    बेस्ट पतपेढीची निवडणूक जिंकल्यानंतर शशांक राव + प्रसाद लाड यांना नेमले भाजपने स्टार प्रचारक; मुंबईत आशिष शेलारांनी तयार केले political buffer!!

    Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला १२ वर्ष ; मास्टरमाइंड मात्र अजूनही सापडेना