• Download App
    Raj Thackeray नवे ठाकरे, नवा रिमोट, नवे सेल; पण कसा जमवणार सर्वांत शक्तिशाली भाजपवर कंट्रोलचा नवा खेळ??

    Raj Thackeray : नवे ठाकरे, नवा रिमोट, नवे सेल; पण कसा जमवणार सर्वांत शक्तिशाली भाजपवर कंट्रोलचा नवा खेळ??

    नाशिक : Raj Thackeray नवे ठाकरे, नवा रिमोट, नवे सेल; पण कसा जमवणार सगळ्यात शक्तिशाली भाजप वर कंट्रोलचा नवा खेळ??, असा सवाल निर्माण झाला आहे. कारण महाराष्ट्रात निवडणुकीनंतर भाजप सत्तेवर असेल. त्यांचा मुख्यमंत्री खुर्चीवर बसेल, पण रिमोट कंट्रोल आपल्या हातात असेल, असा दावा नव्या ठाकरेंनी केला आहे. हे ठाकरे बाळासाहेब नसून, ते राज आहेत. Raj Thackeray

    महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांनी बऱ्याच वर्षांनी रिमोट कंट्रोलची चर्चा सुरू केली आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेवर असेल. भाजपचाच मुख्यमंत्री होईल पण त्यावेळी आपल्याबरोबर असलेले मनसेचे शिलेदार सत्तेमध्ये असतील आणि सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असेल. त्यासाठी आपण नवा रिमोट आणि नवे सेल ही घेतले आहेत, असा दावा केला.

    राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा रिमोट कंट्रोलचे सरकार हा विषय चर्चेमध्ये आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना – भाजप युतीचे सरकार आपल्या रिमोट कंट्रोल वर चालविले होते. ते म्हणतील ते मंत्री आणि ते म्हणतील ते मुख्यमंत्री, ते म्हणाले की मुख्यमंत्री पायउतार आणि ते म्हणाले की नवे मुख्यमंत्री शपथ घेणार, हे सगळे बाळासाहेबांनी रिमोट कंट्रोलच्या आधारे करून दाखविले होते. त्यांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले. नंतर आदेश काढून पायउतार पण केले. त्यांनीच नारायण राणेंना मुख्यमंत्री केले होते.


    Election Commission निवडणूक आयोगाने EVMबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले ; प्रत्येक आक्षेपाला उत्तरे दिली


    पण त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना सीनियर पार्टनर आणि भाजप ज्युनिअर पार्टनर होते आणि तो रिमोट देखील बाळासाहेबांचा होता. त्यामुळे तो त्यावेळी चालून गेला.

    आता महाराष्ट्राची परिस्थिती 360° मध्ये बदलली आहे. त्यावेळी ज्युनिअर पार्टनर असलेल्या भाजप आता सगळ्यात सीनियर पार्टनर बनला असून विधानसभा निवडणुकीत दोनदा 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचा विक्रम भाजपने केला आहे. त्या तुलनेमध्ये नवे ठाकरे म्हणजे राज ठाकरे हे राजकीय शक्तीच्या बाबतीत फारच कमकुवत आहेत. त्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे कितीतरी बळकट आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण होऊन गेले आहेत, तरी देखील राज ठाकरे यांनी आपल्या वक्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्रात विशिष्ट स्थान निर्माण केले आहे आणि त्यांचे 110 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असेल, असा दावा करून त्या रिमोटच्या बळावर भाजपचा मुख्यमंत्री खुर्चीवर बसविण्याचा इरादा बोलून दाखविला आहे. Raj Thackeray

    पण राज ठाकरे यांच्या या रिमोट कंट्रोलच्या वक्तव्यातून महायुतीत मात्र धमाका झाला आहे. कारण जर भाजपचाच मुख्यमंत्री होणार असेल आणि सत्तेचा रिमोट कंट्रोल राज ठाकरे यांच्याकडे राहणार असेल, तर मग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने काय करायचे, कुठले मार्ग पकडायचे??, त्यांच्या राजकीय अस्तित्वाचे काय होईल आणि ते इतरत्र कुठे गेले, तर महाराष्ट्रातले सत्तासंतुलन कुठल्या दिशेला जाईल??, यावर चर्चा सुरू झाली आहे.

    व्यंगचित्र : सुमंत बिवलकर

    Raj Thackeray claims, he will hold remote control of power in maharashtra

     

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस