राज ठाकरे कोरोनामुक्त झाल्याचे समजले. या सर्वांनी यापूर्वीच कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते.Raj Thackeray became corona free, after successful treatment the test came negative
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ३३ ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यांची आज (२९ ऑक्टोबर) त्यांची चाचणी केली असता ते कोरोनामुक्त असल्याचे समजले. राज ठाकरे यांच्यासोबतच त्यांच्या मातोश्री कुंदाताई, बहीणदेखील कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. जलील परकार यांनी ही माहिती दिलीय.
दरम्यान, वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज संध्याकाळी आला. यामध्ये राज ठाकरे कोरोनामुक्त झाल्याचे समजले. या सर्वांनी यापूर्वीच कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच मेळावे पुढे ढकलले.
सध्या सर्वच पक्ष महापालिका निवडणुकीची तयारी करत आहेत. पक्षबांधणी तसेच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याकडे भर दिला जात आहे. मनसेनेदेखील मेळावे, बैठका सुरु केल्या आहेत. २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे मुंबई आणि पुण्यात कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आले होते. मात्र राज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर हे मेळावे पुढे ढकलण्यात आले होते.
Raj Thackeray became corona free, after successful treatment the test came negative
महत्त्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मित निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सात बेड्या तोडून हिंदुत्वाला सबळ केले; रणजित सावरकर यांचे प्रतिपादन
- शिवसेनेचे चार मोहरे राष्ट्रवादीत , कोकणात झाला करेक्ट कार्यक्रम
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात , ‘ या ‘ दिवशी मिळणार बोनससह DA च्या थकबाकीचे पैसे