प्रतिनिधी
संभाजीनगर : एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते अन्य कोणताही मोठा नेता सभेत भाषण करताना जर लाऊडस्पीकरवरून अजान सुरू झाली, तर तो नेता भाषण थांबवतो. त्याच्या बातम्या होतात. पण आज संभाजीनगरात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या सभेच्या वेळी सुरू झालेली बांग थांबवायला पोलिसांना सांगितली. Raj Thackeray asked the police to stop the bang that started during his meeting
हे लोक जर सभेच्या वेळी जर लाऊडस्पीकरवरून बांग देणार असतील तर त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. त्यांना सरळ समजावून सांगा आणि जर सरळ ते ऐकत नसतील तर यापुढे महाराष्ट्रात काय होईल सांगता येणार नाही, असा गंभीर इशारा राज ठाकरे यांनी भर सभेत दिला.
राज ठाकरे यांचे भाषण ऐन रंगात आले असताना संभाजीनगरच्या एका मशिदीतून लाऊडस्पीकरवर बांग सुरू झाली. त्यामुळे राज ठाकरे यांनी पोलिसांना ताबडतोब लाऊडस्पीकर वरची बांग बंद करायला सांगितली. त्यांनी आपले भाषण थांबवायला नकार देऊन भाषण सुरू ठेवले. त्यांनी एकदा नव्हे तर दोन वेळेला पोलिसांना लाऊड स्पीकरवरची बांग बंद करण्याचे आवाहन केले आणि आपले भाषण तसेच सुरू ठेवले.
त्याच वेळी त्यांनी लाऊड स्पीकरला 4 तारखेचा अल्टिमेटम देऊन टाकला. 3 तारखेला ईद असल्यामुळे काही करायचे नाही. पण 4 तारखेला जर त्यांनी मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत, तर त्या मशिदीं समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावलाच पाहिजे, अशी माझी देशभरातल्या सर्व हिंदू बांधवांना हात जोडून विनंती आहे, असे आवाहन त्यांनी केले. राज ठाकरे यांच्या आवाहनाला संभाजीनगर मधल्या जनतेने मोठी गर्जना करत प्रचंड प्रतिसाद दिला.’
Raj Thackeray asked the police to stop the bang that started during his meeting
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : मशिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजेत, अन्यथा महाराष्ट्रातल्या मनगटातील ताकद दाखवू; राज ठाकरेंची गर्जना!!
- Devendra Fadanavis : मशिदींवरचे भोंगे उतरवताना हातभर फाटली आणि म्हणे “यांनी” बाबरी मशीद पाडली!!; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!!
- AAP Mumbai : ठाकरे बंधूंच्या घमासानाला तोंड देण्यासाठी आम आदमी पार्टीची जबाबदारी प्रीती शर्मा – मेननवर!!
- राज ठाकरे यांच्या आडून राष्ट्रवादीचा शिवसेनेवर बाण, म्हणूनच दिली औरंगाबादमध्ये सभेला परवानगी