Maharashtra Floods : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर पूर संकट उभं ठाकलं आहे. राज्यात 10 ठिकाणी दरड कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशा संकटाच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वाचे आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी यासंदर्भात मनसैनिकांना पत्र लिहिलं आहे. Raj Thackeray Appeals MNS Party Workers by letter To Help in Maharashtra Floods
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर पूर संकट उभं ठाकलं आहे. राज्यात 10 ठिकाणी दरड कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशा संकटाच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वाचे आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी यासंदर्भात मनसैनिकांना पत्र लिहिलं आहे.
आपल्या पत्रात राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवघड परिस्थितीत मनसैनिकांनी पूरग्रस्तांना जमेल तितकी मदत करावी. आता लोकांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे. जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोका वाढेल. तुम्ही त्यात लक्ष घालून योग्य ती मदत पोहचेल, असं पाहावं. महाराष्ट्रावर मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कोणतीही कुचराई होता कामा नये.” तसंच काम करताना स्वत:ची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी पत्राद्वारे मनसैनिकांना केलं आहे.
दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरड कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.
Raj Thackeray Appeals MNS Party Workers by letter To Help in Maharashtra Floods
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष, NDRFची 26 पथके, 4 हेलिकॉप्टर्स, लष्करही दाखल; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृह राज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी चर्चा
- Raj Kundra Pornography Case : राज कुंद्राच्या पॉर्न साम्राज्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन? १२१ व्हिडिओंसाठी १२ लाख डॉलर्सचा रेट, मुंबई पोलिसांची माहिती
- Maharashtra Landslide : राज्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- Maharashtra Landslide Updates : राज्यात 10 ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू, अजित पवारांचा राजनाथ सिंहांना फोन, लष्कराची मागितली मदत
- मोठी बातमी : यावर्षी इयत्ता १ली ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती