• Download App
    मुंबई - महाराष्ट्रातले मुस्लिम अतिक्रमण, मशिदींवरील भोंगे यांच्या विरोधात राज ठाकरेंचा पुन्हा एल्गार Raj Thackeray again targets loudspeakers on masques and Muslim encroachments in Mumbai and maharashtra

    मुंबई – महाराष्ट्रातले मुस्लिम अतिक्रमण, मशिदींवरील भोंगे यांच्या विरोधात राज ठाकरेंचा पुन्हा एल्गार

    प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात होत असलेले मुस्लिमांचे अतिक्रमण आणि मशिदींवरील भोंगे यांच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा एल्गार पुकारला. शिवतीर्थावर झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी लाव रे तो व्हिडिओ या सभेची पुनरावृत्ती केली आणि त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील कुपवाडा मधील मंगलमूर्ती कॉलनीतील मुस्लिम गुंडांच्या अतिक्रमण, तसेच मुंबईतील माहीमच्या समुद्रामधील मधील मुस्लिमांचे अतिक्रमण यांचे व्हिडिओ दाखवून त्यांच्याविरुद्ध एल्गार पुकारला. त्याच वेळी मशिदींवरील भोंगे हा विषय आपण सोडलेला नाही तो विषय देखील आपण कायमचा संपवूनच दाखवू, असे आव्हान राज ठाकरे यांनी या सभेत स्वीकारले. Raj Thackeray again targets loudspeakers on masques and Muslim encroachments in Mumbai and maharashtra

    राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमीप्रमाणे शरसंधान साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील फटकेबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरील मुस्लिमांचे अतिक्रमण जसे हटवले, प्रतापगडच्या पायथ्याशी असलेली अफजलखानाची कबर जशी “मर्यादेत” आणून ठेवली त्याच पद्धतीने मुंबईसह महाराष्ट्रातले मुस्लिमांचे अतिक्रमण रोखा, असे आव्हान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.



    उद्धव ठाकरेंच्या मागे जाऊन नुसत्या सभा घेऊ नका, महाराष्ट्रासाठी काम करा!!; राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले

    उद्धव ठाकरेंच्या मागे जाऊन नुसत्या सभा घेऊ नका, महाराष्ट्रासाठी काम करा, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले!!

    राज ठाकरे यांच्या गुढी पाडवा मेळाव्यातल्या भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरे यांनी शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत सुरू असलेल्या वादावर भाष्य केले आहे. महाराष्ट्रातली दोन वर्षातील राजकीय स्थिती पाहतोय, राजकारणाचा झालेला बट्ट्याबोळ आपण सगळंच पाहत आलो. हे सगळं राजकारण पाहत असताना वाईट वाटत होतं. ज्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी वेदना होत होत्या.

    लहान असताना माझ्या छातीवर वाघ असायचा. लहानपणापासून राजकारण पाहत आलो, बाळासाहेबांसोबत अनुभवत आलो. अनेक्यांच्या घामातून उभी राहिलेली संघटना. माझा वाद विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे, हे मी तेव्हा म्हणालो होतो. हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार, खड्ड्यात घातल्यानंतर त्याचा वाटेकरी व्हायची माझी इच्छा नाही म्हणून बाहेर पडत आहे, हे मी तेव्हा बोलत होतो, असं राज ठाकरे म्हणाले.

    आधीच्यांना पक्ष सांभाळता आला नाही, आताचे काय करतात ते बघू? असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. 2006 ला मी पक्ष याच शिवतीर्थावर स्थापन केला. त्यावेळी काय झाले?, कसे झाले?, याचा चिखल मला करायचा नव्हता. काही गोष्टी पसरवल्या गेल्या. राज ठाकरेंना शिवसेनापक्षप्रमुख पद पाहिजे होते, हे सगळं झुट आहे. मला तसे कधी मनात आले नाही, कुणाला ते पेलणार नाही, ते झेपणार नाही. एकाला झेपले नाही, माहित नाही, दुसऱ्याला झेपणार नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले.

    Raj Thackeray again targets loudspeakers on masques and Muslim encroachments in Mumbai and maharashtra

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस