प्रतिनिधी
मुंबई : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आणि त्यांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे. हिंदू देवतांचा अपमान करणारा झाकीर नाईक अथवा असदुद्दीन ओवैसी माफी मागतात का?? मग नुपूर शर्माला माफी मागण्याचे काय कारण??, असा परखड सवाल त्यांनी केला. Raj Thackeray again supports Nupur Sharma’s statement attacking Zakir Naik
राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावली. रवींद्र नाट्यमंदीरात झालेल्या या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध विषयांवर चौफेर फटकेबाजी केली.
भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी आपल्या शस्त्रक्रियेचा किस्सा सांगितला. एकाने मला विचारलं काय झालं. मी म्हटलं हिप रिप्लेसमेंट ऑपरेशन झालं. हार्ट रिपलेसमेंट असते. किडनी रिप्लेसमेंट वगैरे वगैरे. एकाने सांगितलं हिप रिप्लेसमेंट म्हणजे दुसरी लावणार. मी म्हटलं कसं दिसेल ते. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
नुपूर शर्मांच्या वक्तव्याचं समर्थन
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नुपूर शर्मांचं समर्थन केले आहे. नुपूर शर्मा यांनी माफी मागायची काही गरज नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. झाकीर नाईक आपल्या हिंदू देवदेवतांचा अवमान करतो, त्यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी करतो, पण त्यावर कोण काही बोलत नाही, झाकीर नाईकला कोणी माफी मागायला लावत नाही. औवेसी आपल्या देवी-देवतांच्या नावावरुन हेटाळणी करतात, असं सांगत राज ठाकरे यांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याचं समर्थ केलं.
भुजबळांशी तुलना नको
आपण शिवसेनेतून गद्दारी गेली नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. मी सत्तेसाठी शिवसेनेतून बाहेर पडलो नाही, मी बाहेर पडून वेगळा पक्ष काढला, आणि हे सर्व मी बाळासाहेब ठाकरे यांना कल्पना देऊन केलं होतं, शिवसेनेतून बाहेर पडताना मी बाळासाहेबांकडे गेलो त्यांनी मला प्रेमाने अलिंगन दिलं आणि आता जा म्हणून सांगितलं, असे राज ठाकरे यांनी सांगितलं.
मनसे आंदोलनावरून परखड स्पष्टीकरण
राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो मनसे आंदोलनं अर्धवट सोडतो अशी टीका होते, यावरही राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडलेलं आहे, राज्यातील 65 ते 67 टोलनाके आपण बंद केले. माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोल नाके बंद करतो, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
Raj Thackeray again supports Nupur Sharma’s statement attacking Zakir Naik
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात पुन्हा जलयुक्त शिवार अभियान सुरू होणार, 25 हजार दुष्काळग्रस्त गावांना मिळणार मदत
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- सरपंच, नगराध्यक्षाच्या थेट जनतेतून निवडीचे विधेयक मंजूर, मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडले होते विधेयक
- OBC आरक्षणाची सुनावणी ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली ; राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक