• Download App
    Raj Thackeray : मुंबई - ठाणे - पुण्यानंतर राज ठाकरेंचा झंझावात 1 मे रोजी संभाजीनगरात!! । Raj Thackeray: After Mumbai-Thane-Pune, Raj Thackeray's storm in Sambhajinagar on 1st May !!

    Raj Thackeray : मुंबई – ठाणे – पुण्यानंतर राज ठाकरेंचा झंझावात 1 मे रोजी संभाजीनगरात!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मुंबई, ठाणे आणि पुण्यानंतर राज ठाकरे यांचा झंझावात 1 मे रोजी संभाजीनगरात पोहोचणार आहे. राज ठाकरे यांनी आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत या दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. 5 जून रोजी अयोध्येचा दौरा आणि 1 मे महाराष्ट्र दिन संभाजीनगर मध्ये जाहीर सभा. या त्या घोषणा होत्या. Raj Thackeray: After Mumbai-Thane-Pune, Raj Thackeray’s storm in Sambhajinagar on 1st May !!

    मुंबईतील शिवतीर्थावर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यापासून सुरू केलेली मोहीम राज ठाकरे आता संभाजीनगर पर्यंत घेऊन जाणार आहेत. मधल्या टप्प्यात त्यांनी ठाण्यात उत्तर सभा घेतली. काल पुण्यात हनुमान चालीसा महाआरती केली. त्यानंतर ते संभाजीनगरला जाणार आहेत.

    राज ठाकरे यांच्या एका पाठोपाठ एक दौऱ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चैतन्य निर्माण झाले असून राज ठाकरेंनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे शिवसेनेचे पुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांनी कालच आपल्या स्वतःच्या अयोध्या दौऱ्याची तारीखही शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याकडून जाहीर करून घेतली आहे. आदित्य ठाकरे हे मे महिन्यामध्ये अयोग्य साजरा करणार आहेत, तर राज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्या दौरा करणार आहेत. तत्पूर्वी, संभाजीनगरात राज ठाकरे 1 मे महाराष्ट्र दिनी जाहीर सभा घेणार आहेत.



    राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भोंग्यांवरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून, सामाजिक विषय आहे. भोग्यांचा त्रास हा फक्त हिंदूंनाच नाही, तर मुस्लिमांनाही होतो. असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी दोन मोठ्या घोषणाही केल्या आहेत.

    हिंदू बांधवांनो सज्ज व्हा!

    काही  मुस्लिम पत्रकार आहेत. ते बाळा नांदगावकरांना भेटणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मी देशातील तमाम हिंदू बांधवांना विनंती करतो की त्यांनी तयारीत रहावे. 3 तारखेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरले नाहीत, तर त्यांना त्यांच्या शब्दात उत्तर दिले जाणार. देशापेक्षा जर का मुसलमानांना आपला धर्म मोठा वाटत असेल, तर मग आम्ही गप्प बसणार नाही. दिवसभरात 5 वेळा अजान वाजते. त्या त्या वेळेला हनुमान चालिसाही वाजणारच. असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.  मशिदींवरील भोंगे हा अनेक वर्ष असाच राहिलेला विषय आहे. त्यामुळे आता याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्हाला शांतता भंग करायची नाही. त्यांच्या प्रार्थनेला आमचा विरोध नाही. त्यांनी आपली प्रार्थना खुशाल करावी. पण आम्हाला त्रास देऊ नये.

    आमचे हात बांधलेले आहेत काय?

    आमच्या मिरवणुकांवर हल्ला होतो. मग आमच्या हातातही दगड येणारच. आमचे हात काही बांधलेले आहेत का?, असा संतप्त सवालही राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

    Raj Thackeray : After Mumbai-Thane-Pune, Raj Thackeray’s storm in Sambhajinagar on 1st May !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस