• Download App
    लॉकडाऊनमध्येही राज कुंद्राला मिळाले गुगल, ॲपलकडून भरभक्कम उत्पन्न। Raj kundra get money in lockdown too

    लॉकडाऊनमध्येही राज कुंद्राला मिळाले गुगल, ॲपलकडून भरभक्कम उत्पन्न

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उद्योगपती राज कुंद्राने सुरू केलेल्या ‘हॉटशॉट’ या अॅप्लिकेशनचे आर्थिक उत्पन्न हे प्रामुख्याने अॅपल आणि गुगलकडून येत होते. लॉकडाऊनच्या काळातही या अॅप्लिकेशनने तीन महिन्यांत दीड लाख डॉलर्सची म्हणजे तब्बल एक कोटी १७ लाखांची कमाई केली. Raj kundra get money in lockdown too

    मुंबई पोलिसांनी राज कुंद्रासह त्याच्या घराची झडती घेतली. या प्रकरणात कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली होती. त्याच्या घरात पोलिसांना नऊ फायलींसह काही इलेकट्रॉनिक पुरावेदेखील सापडले आहेत. त्याची फॉरेन्सिक ऑडिटरकडून तपासणी केली जात आहे.



    ‘हॉटशॉट’ ॲप्लिकेशनसाठी काम करणाऱ्या साक्षीदार महिलेने दिलेल्या जबाबानुसार हॉटशॉटचे उत्पन्न हे प्रामुख्याने अॅपल आणि गुगलकडून येत होते. तसेच लॉकडाऊनमध्ये अन्य उद्योगधंद्यांवर परिणाम झाला असतानाही हॉटशॉट कंपनीने ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीत एक कोटी १७ लाख रुपयांची कमाई केली होती, परंतु पुढे गुगलने ‘हॉटशॉट’चे खाते बंद केल्याचे आरोपी रेयान थॉर्पने जबाबात सांगितले. मुंबई पोलिसांनी गुगलकडे ‘हॉटशॉट’च्या उत्पन्नाविषयी माहिती देण्याबाबत मागणी केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

    Raj kundra get money in lockdown too

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ