• Download App
    उद्धव ठाकरेंवर राज यांची टीका : उद्धवला देश जेवढा ओळखत नाही तेवढा मी ओळखतो, ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत Raj criticizes Uddhav Thackeray: I know Uddhav as much as the country doesn't know him, he is not to be trusted

    उद्धव ठाकरेंवर राज यांची टीका : उद्धवला देश जेवढा ओळखत नाही तेवढा मी ओळखतो, ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत

    प्रतिनिधी

    मुंबई : उद्धव ठाकरे यांना संपूर्ण देश जेवढा ओळखत नाही तेवढा मी चांगल्या प्रकारे ओळखतो. ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. यापूर्वी मनसे व शिवसेनेतील टाळीसंबंधीची कथित चर्चा झाली. पण उद्धव बोलतात एक व करतात दुसरेच. शिवनेतील फुटीचे श्रेय भाजपला नव्हे, तर स्वतः सेना नेतृत्वाला जाते अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली. Raj criticizes Uddhav Thackeray: I know Uddhav as much as the country doesn’t know him, he is not to be trusted

    राज ठाकरे म्हणाले की, सध्याच्या स्थितीत ‘मातोश्री’ संकटात असल्याचा दावा केला जातोय. त्यात कोणतेही तथ्य नाही. मातोश्री एक वास्तू आहे. त्यावर कोणतेही संकट नाही. वास्तू व संघटना वेगळी असते. सध्या संघटना म्हणजे शिवसेना लयास जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच खासदार संजय राऊत यांच्यामुळे सेनेत बंडखोरी झाली नाही. त्यांचा यात काय संबंध? ते रोज सकाळी टीव्हीवर येतात, अहंकारात काहीतरी बोलतात. ते तेवढ्यापुरते होते. त्यांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नाहीत.



    फडणवीसांना फुकटचे श्रेय नको, उद्धवमुळे शिवसेना फुटली!

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी चांगले मित्र आहोत. मला भेटण्यासाठी फडणवीस घरी आले होते. तेव्हा मी त्यांना म्हटले की, उगाच फुकटचे श्रेय तुम्ही घेऊ नका. त्यावर ते जोरजोरात हसायला लागले. जी गोष्ट घडली ती ना फडणवीसांनी घडवली, ना अमित शहा यांनी घडवली, ना भाजपने, ना अजून इतर कोणी घडवली. शिवसेना फुटण्याचे श्रेय केवळ उद्धव ठाकरे यांना जाते. हे काही शिवसेनेमध्ये एकदा घडलेले नाही. आजपर्यंत अनेक मोठे नेते, आमदार बाहेर पडले, तेव्हा मी बाहेर पडलो होतो. तेव्हाची आणि आताचीदेखील कारणे एकच आहेत. या संपूर्ण गोष्टीला उद्धव जबाबदार आहेत, असे राज म्हणाले.

    उद्धव ठाकरे हे बोलतात एक आणि करतात दुसरेच

    राज ठाकरे म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेत बंडखोरी झालीच नसती. ते शक्यच नव्हते. शिवसेकडे एक पक्ष म्हणून पाहू नका. बाळासाहेब होते तोपर्यंत माणसे एका विचाराने बांधली गेली होती. बाळासाहेब होते तोपर्यंत एक विचार होता आणि त्या विचाराने माणसे बांधलेली होती. उद्धव ठाकरे बोलतात एक आणि करतात दुसरेच. शिवसेनेची वाटचाल ऱ्हासाकडे सुरू झाली आहे. त्यामुळे हळहळ करण्यात अर्थ नाही.”

    Raj criticizes Uddhav Thackeray: I know Uddhav as much as the country doesn’t know him, he is not to be trusted

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस