प्रतापगड जतन संवर्धनासाठी १०० कोटींचा निधी तीन टप्प्यात देण्यात येणार
विशेष प्रतिनिधी
सातारा : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा ३९वा रायरेश्वर ते प्रतापगड गडकोट मोहीमेचा सांगता सोहळा आज महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार या गावात संपन्न झाला. यावेळी उपस्थित धारकऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. Raireshwar to Pratapgad campaign is a tribute to Shivaji Maharaj Chief Minister Shinde
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार नितेश राणे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि मोठ्यासंख्येने धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज या सांगता सोहळ्यासाठी नजर जाईल तिथे हजारो तरुण एकत्र आले असून इथे जणू भगवं वादळ आल्याचा भास होत आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींनी घडवलेला तरुण इथे नजर जाईल तिथे पहायला मिळतोय. त्यांचे व्यक्तिमत्त्व तरुणांना लाजवेल असे असून त्यांच्या प्रेरणेतून आजही लाखो तरुण घडत आहेत. असेही शिंदे यांनी आवर्जून नमूद केले.
आगामी निवडणुकीत मोदींचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागा – एकनाथ शिंदे
या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या मातीत झाला त्या मातीत आपण हा कार्यक्रम करतोय याला वेगळे महत्व आहे. तरुणांना गडकोट किल्यांचे महत्त्व कळावे यासाठी या मोहिमेचे आयोजन केले जाते. रायरेश्वर ते प्रतापगड मोहीम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला मानाचा मुजरा असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
याशिवाय प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या कबरीचे होत असलेले उदात्तीकरण आम्ही थांबवले. मलंगगड देखील लवकरच मुक्त केला जाईल. बाकी गडकोट किल्ल्यावरील अतिक्रमण देखील महाराजांनी शिकवलेल्या गनिमी काव्याने दूर केले जाईल असे स्पष्ट केले. प्रतापगड जतन संवर्धनासाठी १०० कोटींचा निधी तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. गडकोट किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करू अशी ग्वाही याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
Raireshwar to Pratapgad campaign is a tribute to Shivaji Maharaj Chief Minister Shinde
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराचे भाजप खासदाराला विजयी करण्याचे आवाहन; शिवमोग्गामध्ये चांगले काम झाल्याची दिली पावती
- मराठा आरक्षणावर शिंदे – फडणवीस सरकारच्या निर्णयाशी नारायण राणे असहमत; उद्या पत्रकार परिषद घेऊन मांडणार भूमिका!!
- नितीश कुमार हे रंग बदलणारा सरडा; काँग्रेस – राष्ट्रवादीची शिव्यांची लाखोली!!
- बिहारमध्ये भाजपमध्ये देखील खांदेपालट; सम्राट चौधरी, विजय सिन्हा उपमुख्यमंत्रीपदी!!