वृत्तसंस्था
पुणे: महाराष्ट्रातून पावसाने काहीसा काढता पाय घेतला असून त्याने आता उत्तर- मध्य भारताकडे मोर्चा वळविला आहे. आज तेथे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. Rains diverted to North India, Heavy showers fell in North-Central India; Rains fell in sparse places in the Maharashtra
काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. तोआता झारखंडकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस गायब झाला आहे. महाराष्ट्रात आगामी 12 दिवस पावसाची उघडीप राहील आणि अधून मधून तुरळक सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तो खरा ठरत असल्याचे चित्र आहे. सध्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये नव्यानं कमी दाब पट्टा सक्रिय झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा राज्यस्थानच्या गंगानगरपर्यंतआहे. त्यामुळे सध्या राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात पावसाचा जोर वाढला आहे. याठिकाणी बहुतांशी जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला. मागील दोन दिवसांपासून याठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रात मात्र सर्वदूर पावसानं विश्रांती घेतली आहे. विदर्भात हलक्या पावसाची नोंद आहे. पुढील दोन दिवस राज्यात पावसाची खूप कमी शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात मात्र काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी आणि बुधवारी म्हणजेच ३ आणि ४ ऑगस्ट रोजी कोकणातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. मंगळवारी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. तर बुधवारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत वरुणराजा बरसणार आहे. गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावल्यानंतर राज्यातून एकाकी पाऊस गायब झाला आहे.
Rains diverted to North India, Heavy showers fell in North-Central India; Rains fell in sparse places in the Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- जबरदस्त : जम्मू -काश्मिरात देशद्रोह आणि दगडफेक करणाऱ्यांना ना पासपोर्ट मिळणार, ना सरकारी नोकरी; आदेश जारी
- Inspiring : शेतमजुराची मुलगी बनली सीबीएसई 12 वीची टॉपर, अडचणींवर मात करत मिळवले 100 % गुण
- चर्चेची 12वी फेरी सकारात्मक : लडाखमधील 2 वादग्रस्त स्थळांवरून माघार घेण्यास चीन तयार, पीएलए हॉट स्प्रिंग आणि गोगरा पॉइंटमधून माघार घेणार
- आता तुम्ही तुमचे वय फेसबुकपासून लपवू शकणार नाही, १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे युजर्स ओळखसाठी हे खास तंत्रज्ञान वापरणार
- अधिवेशनाचे २ आठवडे संसदेत नुसता गोंधळ : १०७ तासांपैकी केवळ १८ तास काम, १३३ कोटींचे नुकसान; राज्यसभा २१% , तर लोकसभेत फक्त १३% कामकाज