विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद – मराठवाड्यातील काही भागात जवळपास महिनाभरापासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. प्रदीर्घ खंडानंतर मराठवाड्यात पावसाने कुठे तुरळक, कुठे मध्यम तर कुठे दमदार हजेरी लावली. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी अधूनमधून श्रावणधारा बरसतच होत्या.Rain started in all over marathwada region
औरंगाबाद जिल्ह्यातील ६२ मंडळांपैकी औरंगाबाद तालुक्या.तील हर्सूल मंडळाचा अपवाद वगळता ६१ मंडळांत पावसाची कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली. बीड जिल्ह्यातील ६३ मंडळांपैकी ६१ मंडळांत पावसाची हजेरी लागली. गेवराई तालुक्या त पावसाचा सर्वाधिक जोर होता. जालना जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ४९ मंडळांत पावसाने हजेरी लागली.
अंबड तालुक्या त पावसाचा जोर सर्वाधिक होता. उस्मानाबाद, लातूरला मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३७ मंडळातच पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील सर्व ६० मंडळात कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली.
नांदेड जिल्ह्याात सर्वदूर भिजपाऊस झाला. परभणीत जिल्ह्यातही सर्वत्र रिमझिम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात २२ दिवसांच्या विश्रांतीनंतर दुसऱ्या दिवशीही पाऊस झाला. मंगळवारी सकाळी आठपर्यंत १७. ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Rain started in all over marathwada region
महत्वाच्या बातम्या
- जावेद अख्तर- शबाना आझमी यांची अमेरिकेवर टीका, कसली महासत्ता जी तालीबान नावाच्या रानटी लोकांना संपवू शकली नाही?
- रशियाला आला तालीबानचा पुळका, तालिबानच्या नियंत्रणात काबुलची स्थिती चांगली असल्याचे दिले सर्टिफिकेट
- ट्विटरने झटका दिल्यावर आता फेसबुकचीही राहूल गांधींना नोटीस, इन्स्टाग्रामवरील ती पोस्ट त्वरित हटविण्याचे आदेश
- आंध्र प्रदेश सरकारची लपवालपवी, आता सरकारी आदेश, अध्यादेश वेबसाईटवर टाकणार नाही