• Download App
    शिवसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, कोथळा बाहेर काढण्याची भाषा करत म्हणाले राणे म्हणजे भारतीय जनता पक्षाने भुंकण्यासाठी ठेवलेला कुत्रा|Railway Minister Ashwini Vaishnav learned about the problems of passengers while traveling by train

    शिवसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, कोथळा बाहेर काढण्याची भाषा करत म्हणाले राणे म्हणजे भारतीय जनता पक्षाने भुंकण्यासाठी ठेवलेला कुत्रा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप करत अटकेचे नाट्य घडविणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या आमदारांच्या वक्तव्यांवर मात्र पोलीस मुग गिळून गप्प बसले आहे. हिंगोलीचे आमदार यांनी तर कोथळा बाहेर काढण्याची भाषा करत राणे म्हणजे भारतीय जनता पक्षाने भुंकण्यासाठी ठेवलेला कुत्रा असल्याचे म्हटले आहे.Railway Minister Ashwini Vaishnav learned about the problems of passengers while traveling by train

    आमदार संतोष बांगर यांनीही राणेंना धमकी दिली. राणेंना एक संदेश द्यायचा आहे. तुमच्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यात आहे. पोलिस सुरक्षा बाजूला कर. शिवसेनेच्या या मावळ्याने एकटा येऊन तुला चारी मुंड्या चीत नाही केले अन कोथळा बाहेर काढला नाही तर नावाचा संतोष बांगर नाही, अशी धमकीच त्यांनी दिली आहे



    राणेंचे हे बेताल वक्तव्य नाही, तर माजलेले वक्तव्य आहे. केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतरचा हा माज आहे. विरोधी पक्षाने केवळ त्यांना भुंकण्यासाठीच सोडले आहे. माझा त्या कोंबडी चोराला इशारा आहे. मुख्यमंत्र्यांच्या थोबाडात मारण्याची भाषा करता. यापुढे बेदअदबीने वागला तर घरात घुसून तुमचा हिशेब चुकता करू, असा इशारा बांगर यांनी दिला आहे.

    यवतमाळचे शिवसेना पदाधिकारी संतोष ढवळे यांनी राणेंना थेट एन्काऊंटर करण्याची धमकी दिली. शिवसेनेत अनेक माथेफिरू शिवसैनिक आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांचा आणि मातोश्रीचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आम्ही शिवसैनिक या वक्तव्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. शिवसैनिकांनो, त्याचा एन्काऊंटर आपणच वाचवला आहे.आता आपल्यालाच त्यांचा एन्काऊंटर करायचा आहे. खूणगाठ बांधा व त्यांचा एन्काऊंटर करायला निघा, असे आवाहन ढवळे यांनी केले.

    Railway Minister Ashwini Vaishnav learned about the problems of passengers while traveling by train

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस