• Download App
    मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून नार्वेकरांना कॉर्नर करत त्यांच्याचकडून न्यायाची ठाकरे - पवारांची अपेक्षा की दबाव?? Rahul narvekar meet CM eknath shinde, thakrey - pawar targets narvekar

    मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून नार्वेकरांना कॉर्नर करत त्यांच्याचकडून न्यायाची ठाकरे – पवारांची अपेक्षा की दबाव??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली ही भेट म्हणजे न्यायाधीशाने आरोपीला जाऊन भेटण्यासारखे आहे, अशी टीका माध्यमांमधले उल्हास बापट यांनी केल्यावर बरोबर शिवसेनेचा ठाकरे गट आणि शरद पवार यांनीही राहुल नार्वेकरांना घेरले. त्यांना त्यांना कॉर्नर केले आणि त्यांच्याचकडून ते न्यायाची अपेक्षा ठेवत आहेत. Rahul narvekar meet CM eknath shinde, thakrey – pawar targets narvekar

    पण विधानसभा अध्यक्षांना असे कॉर्नर करून ते अपात्रतेच्या आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर आपल्या बाजूने निकाल येण्याची अपेक्षा ठेवत आहेत की अध्यक्षांवर दबाव आणत आहेत??, हा सवाल तयार झाला आहे.

    नार्वेकर – शिंदे भेटीवरून ठाकरे गटाचे विधानसभेतले प्रथम सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निकाल दोनच दिवसात लागणार असताना विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे हा अवचित्यभंग असल्याचे सुनील प्रभू यांनी याचिकेत नमूद केले आहे.

    ज्यांच्या विरुद्ध आमदार अपात्रतेची केस आहे त्यांच्याकडे जाऊन विधानसभा अध्यक्षांनी भेट घेणे हे अध्यक्ष पदाची प्रतिष्ठा घालवण्यासारखे आहे. नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा राखावी, असे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर केवळ आजच ठाकरे पवारांकडून कॉर्नर झाले असे नाही, तर याआधी देखील अनेकदा ठाकरे गटाने नार्वेकरांवर आणि त्यांच्या कृतीवर आक्षेप घेतला आहे. मात्र त्यावेळी आपण कोणत्याही प्रकारचा दबाव सहन न करता घटना आणि कायद्यानुसारच आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय देऊ, असे नार्वेकरांनी आधीच स्पष्ट केले आहे, तरीदेखील ठाकरे गटाने याचा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून उद्या अपेक्षित असणारा निकाल आणखी लांबवला आहे का??, असा सवाल तयार झाला आहे.

    Rahul narvekar meet CM eknath shinde, thakrey – pawar targets narvekar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!