विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारताची आर्थिक राजधानी मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टीने क्रांतिकारक प्रकल्प ठरणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सर्वेक्षण 18 मार्चपासून सुरू होणार असताना राहुल गांधींनी आज धारावीत जाऊन उद्योगपती गौतम अदानी आणि अंबानी यांच्याविरुद्ध “एल्गार” पुकारला. धारावीची जमीन इथल्या झोपडपट्टीवासियांची आहे ती काही दलाल हिरावून घ्यायला येणार आहेत. ती जमीन त्यांना देऊ नका, अशी चिथावणी देऊन राहुल गांधींनी धारावी पुनर्विकास प्रकल्पात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. Rahul Gandhi’s Dharavi on the day before the launch of Dharavi Redevelopment Survey
महाराष्ट्र शासन आणि गौतम अदानी यांची कंपनी मिळून धारावी पुनर्विकास प्रकल्प साकार करणार आहेत. यामध्ये धारावीतील अधिकृत निवासी असलेल्या कुटुंबांना 350 स्क्वेअर फुटांची निवासस्थाने बांधून मिळणार आहेत. यासाठी 18 मार्चपासून संपूर्ण धारावीत सर्वेक्षण सुरू होणार असून त्यामध्ये “डिजिटल धारावी” प्रकल्प अंतर्गत कुटुंबांची सविस्तर नोंदणी आणि नामनिर्देशन सुरू होणार आहे. संपूर्ण धारावीच्या वस्त्यांमध्ये घरांचे लेझर मॅपिंग देखील होणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प संपूर्ण जगभरातला सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आज धारावी मध्ये आपल्या भारत जोडो यात्रेची समाप्ती केली, पण त्याचवेळी त्यांनी उद्योगपती गौतम अडाणी आणि अंबानी यांच्यावर शरसंधान साधून धारावी मधली जमीन दलालांना देऊ नका, अशी चिथावणी दिली.
देशातले मोदी सरकार शेतकरी महिला मजूर यांच्या विरोधात आहे ते फक्त अदानी आणि अंबानी यांच्या बाजूने उभे राहणारे सरकार आहे. धारावीची जमीन ही तुमच्या सगळ्यांची म्हणजे झोपडपट्टीवासीयांच्या मालकीची जमीन आहे. ती जमीन हिसकावून घ्यायला इथे काही दलाल घुसले आहेत, पण ती जमीन त्यांना देऊ नका, अशी चिथावणी राहुल गांधींनी धारावीवासीयांना दिली.
Rahul Gandhi’s Dharavi on the day before the launch of Dharavi Redevelopment Survey
महत्वाच्या बातम्या
- अखेर BRS नेत्या कविता यांना अटक; हैदराबादेत 8 तासांच्या छाप्यानंतर ईडीची कारवाई
- आदित्य + सुप्रियांचे नेतृत्व लादण्याच्या मोहापायी शिवसेना + राष्ट्रवादी फुटली; अमित शाहांचा घणाघात!!
- ‘CAA हा भारताचा अंतर्गत मामला आहे’, अमेरिकेच्या टिप्पणीवर परराष्ट्र मंत्रालयाने दिले प्रत्युत्तर
- दिल्ली मद्य धोरण प्रकरणी EDची मोठी कारवाई, केसीआर यांची मुलगी कविता यांच्या घरावर छापेमारी