• Download App
    राहुल गांधी मातोश्री वर येणार नाहीत, तसा कोणताही प्रोग्रॅम नाही; नानांचा तातडीने खुलासा; पण बातमीची पुडी सुटली कुठून आणि का??|Rahul Gandhi will not come to matoshree and not to meet Uddhav Thackeray, clarifies nana patole

    राहुल गांधी मातोश्री वर येणार नाहीत, तसा कोणताही प्रोग्रॅम नाही; नानांचा तातडीने खुलासा; पण बातमीची पुडी सुटली कुठून आणि का??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विशिष्ट भूमिकांमुळे बॅकफूटवर जावे लागलेल्या राहुल गांधींना आता पुढचा धक्का देत मराठी माध्यमांनी त्यांच्या “सूत्रां”च्या हवाल्याने राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याच्या बातम्या दिल्या. पण या बातम्या पाहिल्याबरोबर तातडीने पुढे येऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खुलासा करून टाकला, राहुल गांधी मातोश्रीवर येणार नाहीत. तसा कोणताही प्रोग्रॅम नाही!!Rahul Gandhi will not come to matoshree and not to meet Uddhav Thackeray, clarifies nana patole

    जर राहुल गांधी मूळात मातोश्रीवरच येणार नाहीत आणि तसा कोणताच प्रोग्रामच नाही, तर नानांसारख्या प्रदेशाध्यक्ष पातळीवरच्या नेत्याने एवढ्या धावपळीत पुढे येऊन खुलासा करण्याचे कारणच काय होते?? अशी “कोणत्या सूत्रां”च्या हवाल्याने मराठी माध्यमांनी बातमी दिली होती, की ज्यामुळे नानांना धावपळ करून लगेच खुलासा करावा लागला??, त्यामागचे नेमके राजकीय इंगित काय आहे??, याचा थोडासा अदमास लावला, तर ते कालच्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरातल्या भेटीत तर दडले नाही ना??, असा संशय घ्यायला वाव आहे.



    काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी राहुल गांधी आणि खर्गे यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये विरोधी ऐक्याविषयी चर्चा झाली. तशा बातम्या आल्या. त्या नेत्यांनी देखील पत्रकारांना तसेच सांगितले. पण आज सकाळी अचानक राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना भेटणार. उद्धव ठाकरेंच्या “राष्ट्रीय” नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणार, अशा बातम्या मराठी माध्यमांमध्ये झळकल्या. अर्थातच त्या “सूत्रां”च्या हवाल्याने झळकल्या होत्या. नानांनी तर त्या बातमीचा इन्कार केला आहे. मग मराठी माध्यमांनी नेमक्या “कोणत्या सूत्रां”च्या हवाल्याने त्या बातम्या दिल्या होत्या आणि कशासाठी दिल्या होत्या?? या बातम्यांमधून कोणाला कोणता नॅरेटिव्ह सेट करायचा आहे?? आणि हा नॅरेटिव्ह कोणाच्या राजकारणासाठी कसा उपयोगी पडणार आहे?? हे प्रश्न तयार झाले आहेत.

    अदानी मुद्द्यावर पवारांना अपयश

    उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावर राहुल गांधींना बॅकफूटवर ढकलण्यात यशस्वी झाले. परंतु अदानी मुद्द्यावर मात्र शरद पवार राहुल गांधींना पूर्ण बॅकफूटवर ढकलू शकले नव्हते. त्यांनी एनडीटीव्हीला मुलाखत देऊनही अदानी भूमिकेपासून राहुल गांधी अजिबात ढळले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मग राहुल गांधींच्या मातोश्री भेटीचा मुद्दा काढून त्यांना नव्याने दिवस का येते काय हा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे??, असे कदाचित पवारांसारख्या नेतृत्वाला वाटू शकते.

    गांधी परिवार प्रादेशिक नेत्यांकडे जात नाही

    यातून दोन गोष्टी साध्य होऊ शकतात. एक तर राहुल गांधींना मातोश्रीवर आणून त्यांना प्रादेशिक नेत्यांच्या रांगेत बसवता येते. आत्तापर्यंत गांधी परिवारातले कोणतेही नेते अगदी एखादा अपवाद वगळता क्वचित प्रसंगी कोणत्याही प्रादेशिक नेत्याच्या घरी गेले आहेत. यातला कोणाही प्रादेशिक महत्त्वाच्या नेत्याचा निधनाचा प्रसंग वगळला तर असे क्वचितच घडले आहे. त्यामुळे गांधी परिवारातील कोणीही नेता प्रादेशिक नेत्याच्या घरी जात नसताना राहुल गांधी हे मातोश्रीवर येणे आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी काही चर्चा करून उद्धव ठाकरेंच्या “राष्ट्रीय” नेतृत्वावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यताच दुरापास्त आहे.

    बातमीची पुडी सुटली कुठून?

    मग नेमकी “कोणत्या सूत्रां”च्या हवाल्याने मराठी माध्यमांनी राहुल गांधींच्या मातोश्री भेटीची बातमी केली आणि त्यावरून महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली??, याचे इंगित समजायला कालची मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेली पवार – खर्गे – राहुल बैठक आहे का?? आणि त्यातून या राहुल यांच्या मातोश्री भेटीच्या बातमीची पुडी सुटली आहे का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!

    Rahul Gandhi will not come to matoshree and not to meet Uddhav Thackeray, clarifies nana patole

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    महापालिका निवडणुकांमध्ये विरोधकांची हाराकिरी; पण भाजपवाल्यांना “सेल्फ गोल” करण्याची हौस लै भारी!!

    पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो प्रवासाची लालूच दाखवताना अजितदादांची “गेम”; महापालिकेला अधिकारच नसताना परस्पर दिले आश्वासन!!

    सावधान! मुंबईची लोकसंख्याशास्त्रीय ओळख पुसण्याचा डाव; ‘व्होट बँक’ की शहरावर कब्जा?