विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्य लोकसभा निवडणुकीत अंगलट येण्याची भीती वाटल्याने काँग्रेसने लोकसभा निवडणुकीपुरते पक्षातून काढून टाकलेले इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आता लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला असून राहुल गांधी हे “उच्चशिक्षित” असून त्यांना प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान आहे. ते “पप्पू” नाहीत, तर रणनीतीकार आहेत, असे ते म्हणाले. अमेरिकतेल्या टेक्ससमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान करून राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यासाठी प्रतिमा निर्मिती करून घेतली. Rahul Gandhi Not Pappu
राहुल गांधी हे तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते पद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. यादरम्यान ते अनेकांच्या भेटी घेत आहेत. अशात ते रविवारी प्रवाशी भारतीयांच्या एका कार्यक्रमातही सहभागी झाले. यावेळी त्यांच्याबरोबर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदाही होते. या कार्यक्रमात बोलताना सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधींचे पुन्हा कौतुक केले.
सॅम पित्रोदा म्हणाले :
राहुल गांधींचा अजेंडा हा, काही मोठ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांना संबोधित करणं हा आहे. भाजपा करोडो रुपये खर्च करून ज्याप्रकारे प्रचार करते, त्यापेक्षा वेगळा दृष्टीकोन त्यांच्याकडे आहे. हे मला सांगावेच लागेल की राहुल गांधी हे “पप्पू” नाहीत, तर ते उच्चशिक्षित आहेत. ते प्रत्येक विषयावर सखोल विचार करतात. ते एक रणनीतीकार आहेत.
10 वर्षांपासून भाजप त्यांच्या विरोधात प्रचार करत आहे. मात्र, मला राहुल गांधी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. देशाला जुमल्यांची नाही, आधुनिक विचारांच्या नेत्यांची गरज आहे.
मी राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, मनमोहन सिंग, व्ही. पी. सिंह, चंद्रशेखर आणि एच. डी. देवेगौडा यांसारख्या अनेक पंतप्रधानांसोबत काम केले आहे. मला अनेक माजी पंतप्रधानांना जवळून पाहण्याची संधी मिळाली आहे. पण कदाचित राहुल आणि राजीव यांच्यातील फरक हा आहे की, राहुल गांधी हे राजीव गांधींपेक्षा अधिक हुशार आहेत. त्यांना लोकांची काळजी आहे.
राहुल गांधींना उच्चशिक्षित असल्याचे आणि पप्पू नसल्याचे सर्टिफिकेट देणारे हेच ते सॅम पित्रोदा आहेत, ज्यांनी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात झालेल्या शीख विरोधी दंगलीला “हुआ तो हुआ” म्हणून काँग्रेसची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. सॅम पित्रोदांची वादग्रस्त वक्तव्ये अंगलट येतील या भीतीपोटी काँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकले होते परंतु निवडणूक निकालानंतर लगेच त्यांना पुन्हा एकदा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष नेमले.
Rahul Gandhi Not Pappu
महत्वाच्या बातम्या
- Kargil War : कारगिल युद्धाबाबत पाकिस्तानची मोठी कबुली; लष्करप्रमुखांच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
- KP sharma Oli : नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांचा भारताबाबतचा सूर बदलला, म्हणाले..
- Tuhin Kant Pande : तुहिन कांत पांडे असणार देशाचे नवे अर्थ सचिव; सरकारने जारी केला नियुक्ती आदेश
- Chief Minister Sarma : मुख्यमंत्री सरमांची आणखी एक मोठी घोषणा! आधार कार्डसाठी द्यावा लागणार ‘हा’ नंबर!