• Download App
    महाविकास आघाडी सरकारचा कारभार शेतकरीविरोधी, राधाकृष्ण विखे- पाटील यांचा आरोप|Radhakrishna Vikhe-Patil's allegation that the Mahavikas Aghadi government is anti-farmer

    महाविकास आघाडी सरकारचा कारभार शेतकरीविरोधी, राधाकृष्ण विखे- पाटील यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    संगमनेर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कारभार सत्तेत आल्यापासून शेतकरीविरोधी राहिला आहे. अधिवेशनाला सामोरे जाण्याची त्यांची तयारी नाही. सरकार यापासून पळ काढते आहे. त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही, अशी टीका माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.Radhakrishna Vikhe-Patil’s allegation that the Mahavikas Aghadi government is anti-farmer

    कृषीपंपांचा वीजपुरवठा वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीकडून खंडित करण्यात येतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते आहे. महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच वीजपुरवठा पूर्ववत करावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार विखे पाटील बोलत होते.



    विखे म्हणाले, सार्वभौम सभागृहात राज्यातील जनतेच्या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे, तिथे न्याय मिळाला पाहिजे. मात्र, दोन वर्षे झाली सभागृहच चालविले जात नाही. समाजातील कोणताच घटक या सरकारबद्दल सुखी नाही. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.

    परंतु सरकारला याचे काहीही घेणे-देणे नाही. सरसकट वीजजोडणी तोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सत्तेत आल्यानंतर वीजबिल माफ करू, या दिलेल्या आश्वासनाचे भान सरकारला राहिलेले नाही. सरकार नियमबाह्य कृती करते आहे. दुदैर्वाने राज्यात महावसुली चालू असून महापाप करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे.

    Radhakrishna Vikhe-Patil’s allegation that the Mahavikas Aghadi government is anti-farmer

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस