विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला हे आपोआप समोर येईल, असे म्हणत माजी मंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.Radhakrishna Vikhe Patil warns that another minister’s corruption will be investigated, how much revenue someone has collected will come to light
श्रीरामपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी हा आरोप केला. हा मंत्री कोण, असं पत्रकारांनी विचारलं असता ‘जरा सबुरीने घ्या, लवकरच नाव उघड होईल,’ असेही विखे पाटील म्हणाले. विखे पाटील यांनी कोणाचंही नाव घेतले नाही. मात्र, त्यांचा रोख महसूलमंत्री थोरात यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.
विखे पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या मंत्री व दलालांचे साटेलोटे रोज समोर येत आहे. राज्यातील काही प्रकरणे उघड झाल्यानंतर आता नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री अडकलेला असल्याचं लवकरच समोर येईल.
संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता ते ईडी आणि सीबीआयवर आरोप करू लागतील. आपली पापे झाकण्यासाठी तपास यंत्रणांवर आरोप केले जात आहेत. या संस्थांना बदनाम करून आपली पापे त्यांना झाकता येणार नाहीत,
Radhakrishna Vikhe Patil warns that another minister’s corruption will be investigated, how much revenue someone has collected will come to light
महत्त्वाच्या बातम्या
- Aryan Khan Drugs Case : ड्रग्जप्रकरणी असदुद्दीन ओवैसी म्हणतात- ज्यांचा बाप ताकदवान त्यांच्यासाठी आवाज उठवणार नाही!
- अंतराळात चित्रपटाच्या शूटिंगचा विक्रम रशियाच्या नावावर, 40 मिनिटांच्या सीनसाठी लागले 12 दिवस, क्रू सुखरूप पृथ्वीवर परतला
- Target Killing : काश्मिरात दहशतवाद्यांचे पुन्हा भ्याड कृत्य, कुलगाममध्ये तीन परप्रांतीयांवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू
- एम्सच्या विद्यार्थ्यांचे राम-सीतेवर वादग्रस्त वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल झाल्यास मागितली माफी